'बिग बॉस मराठी 5' चे पहिलं एलिमिनेशन, आठवड्याभरातच कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर!

Last Updated:

बिग बॉस मराठीचा सीझन सुरु होऊन एक आठवडा झाला आणि पहिला स्पर्धक या सीझनमधून एलिमिनेट झाला.

'बिग बॉस मराठी 5' चे पहिलं एलिमिनेशन
'बिग बॉस मराठी 5' चे पहिलं एलिमिनेशन
मुंबई : बिग बॉस मराठी 5 सुरु झाल्यापासून सगळीकडे याचाच बोलबाला पहायला मिळतोय. नवे स्पर्धक, नवा होस्ट, नवे नियम, यामुळे सर्वच यंदा हटके अंदाजात आहे. स्पर्धक आणि रितेश भाऊ त्यांच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. बिग बॉस मराठीचा सीझन सुरु होऊन एक आठवडा झाला आणि पहिला स्पर्धक या सीझनमधून एलिमिनेट झाला.
बिग बॉस मराठीच्या घरामधून पहिल्याच आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. 'राम कृष्ण हरी' म्हणत त्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. पुरुषोत्तमदादा एक वेगळा फ्लेवर घेऊन आले. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा प्रवास संपला. 'राम कृष्ण हरी' म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी ते घरातून बाहेर पडले.
advertisement
घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, 'बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकलं असल्याचं मला वाटत नाही. घरामधला वावर कसा करायचा हे समजता समजता बाहेर आलोय. अनुभव थरारक आहे. स्वत:शी ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं हे घर फार महत्त्वाचं आहे.'
advertisement
बिग बॉस मराठीच्या घरात एखाद्या गोष्टीला प्रतिकार करायला मला जमलं नाही. तरी जिथे नडता आलं तिथे नडलो. यापुढे घरातील इतर सदस्य मित्रांमध्ये मी मला पाहील. 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन अभिजीत सावंत जिंकू शकतो. तर सूरज चव्हाण या सीझनमधील वीक खेळाडू आहे, असंही पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले.
advertisement
दरम्यान, घरात 16 स्पर्धकांची एण्ट्री झाली होती आता यातील 15 सदस्य उरले आहेत. त्यामुळे या बिग बॉसच्या रेसमध्ये कोण लंबी रेसचा घोडा ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बिग बॉस मराठी 5' चे पहिलं एलिमिनेशन, आठवड्याभरातच कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement