परदेसी गर्ल इरिना रुवाकोडा आणि अभिनेता वैभव चव्हाण यांची केमिस्ट्री जुळून येतान दिसत आहे. दोघांमध्ये प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. बिग बॉसच्या नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात इरिना वैभवच्या बोलवण्यावर लाजताना दिसतेय. वैभव वारंवार तिचं कौतुक करताना दिसतोय.
( ये तो होना ही था! निक्की - अरबाजमध्ये कडाक्याचं भांडणं, नेटकऱ्यांनी उडवली चांगलीच खिल्ली )
advertisement
प्रोमोमध्ये वैभव इरिनाला म्हणतोय,"कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय". त्यावर इरिना म्हणते "हो का". वैभवचं बोलण ऐकून इरिना लाजते. इतकंच नाही तर टास्क दरम्यानही इरिना खूप वैतागते तेव्हाही वैभव तिला शांत करताना दिसतोय. वैभव इरिनाचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. तिला शांत हो असं म्हणतो आणि तिच्याकडे फार प्रेमानं पाहाताना दिसतोय.
तर दुसरीकडे जान्हवी देखील वैभवला इरिनावरुन चिडवताना दिसतेय. ती त्याला म्हणते, "फॉरेनची पाटलीन मस्त आहे". त्यावर निक्की म्हणतेय,"भाई...तुझं काय चाललंय". यावर वैभव देखील गालतल्या गालात हसताना दिसतोय.
आता या प्रोमोवरून तरी इरिना आणि वैभव यांच्यात प्रेमाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय पण त्यांच्या प्रेमाची गाडी पुढे जाईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. आता यात कोण बाजी मारणार हे देखील पाहणं इंटेरेस्टिंग असणार आहे.