ये तो होना ही था! निक्की - अरबाजमध्ये कडाक्याचं भांडणं, नेटकऱ्यांनी उडवली चांगलीच खिल्ली

Last Updated:

पहिल्या आठवड्यात एकमेकांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या अरबाज आणि निक्की यांच्यात दुसऱ्याच आठवड्यात वादाची ठिणगी पडली आहे.

बिग बॉस मराठी 5 अपडेट
बिग बॉस मराठी 5 अपडेट
मुंबई : बिग बॉस मराठी 5च्या घरात पहिल्याच आठवड्यात एक कपल असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. ते म्हणजे नक्की तांबोळी आणि अरबाज खान. निक्की आणि अरबाज यांच्यात घरात जाताक्षणी नजरा-नजर, लाजणं, मुरडणं सुरू झालं होतं. दोघे एकमेकांना लाईक करत असल्याचं अनेकदा पाहण्यात आलं. घरातील इतर सदस्यांनी देखील त्यांना अनेकदा चिडवण्याचा चान्स सोडला नाही. पण बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात जुळलेल्या जोड्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात सोबत राहत नाहीत हे ही तितकंच खरं आहे.
पहिल्या आठवड्यात एकमेकांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या अरबाज आणि निक्की यांच्यात दुसऱ्याच आठवड्यात वादाची ठिणगी पडली आहे. निक्की-अरबाज यांच्यात जोरदार भांडणं वाजल्याचं पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निक्की-अरबाज यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे ज्यात निक्की आणि अरबाज एका विषयावर बोलत आहे. "आपण त्यांच्यावर अटँक केला आहे", असं निक्की सांगत असते. त्यावर अरबाज तिला म्हणतो, "तुम्ही इतके नाजूक असाल तर घरी बसा. तू त्याची साइड घेऊ नको. घ्यायची तर त्याची पूर्ण साइड घे". त्यावर निक्की म्हणते, "मी त्याची साइड घेत नाहीये. माझ्यासमोर तू असा एटिट्यूट दाखवू नकोस". त्यावर अरबाज म्हणतो, "तू ही मला एटिट्यूट दाखवू नकोस" आणि तिथून निघून जातो. त्यावर निक्की त्याला म्हणते, "मी इथेच उभी आहे. तू मला एटिट्यूड दाखवून निघून जात आहेस".
advertisement
निक्की आणि अरबाज यांची ही भांडणं पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका युझरनं लिहिलंय, "ये तो होना ही था". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "आता निक्की आणि अरबाज एकमेकांच्या विरोधात जाणार लवकरच". तर आणखी एका युझरनं लिहिलंय, "ती निक्की कोणाची नाहीये....नका रे तिच्या वर विश्वास ठेऊ".
advertisement
निक्कीनं विकेंडला रितेशभाऊच्या धक्क्यावर अरबाजची बाजू घेतली. "अरबाज माझा मित्र आहे आणि त्याच्यासाठी माझा नेहमी सॉफ्ट कॉर्नर असेल", असं सांगितलं. त्यावर रितेशनं तिला म्हटलं, "बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात झालेल्या जोड्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंतही टिकत नाही".
मराठी बातम्या/मनोरंजन/
ये तो होना ही था! निक्की - अरबाजमध्ये कडाक्याचं भांडणं, नेटकऱ्यांनी उडवली चांगलीच खिल्ली
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement