TRENDING:

Suraj Chavan: सूरज चव्हाणने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला सर्वांनी स्टेटस ठेवा!

Last Updated:

'बिग बॉस मराठी 5' च्या सीझनचा विनर गोलीगत सूरज चव्हाण ठरला. त्याने झापुक झुपूक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांचं प्रेम आणि भरभरुन वोट मिळवून त्याने शेवटी ट्रॉफीवर नाव कोरलंच.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' च्या सीझनचा विनर गोलीगत सूरज चव्हाण ठरला. त्याने झापुक झुपूक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांचं प्रेम आणि भरभरुन वोट मिळवून त्याने शेवटी ट्रॉफीवर नाव कोरलंच. 70 दिवसांच्या बिग बॉसचा विनर सूरज झाल्यानंतर त्याच्यावर खूप कौतुकांचा वर्षाव होतोय. लोक त्याला 'मातीतला माणूस' बोलत आहेत. अशातच सूरजच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
 सूरज चव्हाणने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला सर्वांनी स्टेटस ठेवा!
सूरज चव्हाणने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला सर्वांनी स्टेटस ठेवा!
advertisement

सूरज चव्हाणने त्याचा आगामी सिनेमा 'राजाराणी' चा ट्रेलर आऊट झालाय. यामध्ये सूरजचा हटके लूक आणि गोलीगत स्टाईल लोकांचं लक्ष वेधणारी आहे. बिग बॉसमध्ये तर सूरज चर्चेचा विषय राहिलाच आता बाहेर आल्यावरही त्याचा धुरळा पाहायला मिळतोय. सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'राजाराणी' मुळे चर्चेत आहे.

'राजाराणी' सिनेमा ट्रेलर

सूरजने सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं, "भावांनो नमस्कार, मला सांगायला आनंद होतोय, मी तुमच्या आशीर्वादाने बिग बॉस विजेता झालो, आता माझा खूप आवडता येत्या 18 ऑक्टोबर 2024 पासून 'राजाराणी' नावाचा भारी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, जसा बिग बॉस ला सपोर्ट केला तसा माझ्या 'राजाराणी' चित्रपटाला सुद्धा सुपरहिट करा ही विनंती."

advertisement

कोणी फसवू नये म्हणून रितेश भाऊंनी दिला मॅनेजर, सूरजने सांगितलं व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं?

सूरजच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलरवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय. अनेकांनी म्हटलं, "तुझ्यामुळे फिल्म हिट होईल फक्त हिरो पेक्षा जास्त पैसे घे त्यांच्याकडून", "भावा फुल्ल सपोर्ट महाराष्ट्र कडून", "सूरज जिंकला म्हणजे कल्ला होणारच की", "जसा बिग बॉस हिट झालं तसाच हा पिक्चर पण हिट" अशा अनेक कमेंट लोक करत त्याला सपोर्ट करत आहेत.

advertisement

दरम्यान, गोलीगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या प्रेक्षकांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बिग बॉस मधील त्याच्या गोष्टींना अनेकांनी रिलेट केलं. बिग बॉसच्या घरात असताना सूरजने त्याच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. हळूहळू त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan: सूरज चव्हाणने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला सर्वांनी स्टेटस ठेवा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल