TRENDING:

'हाकला रे हिला घरा बाहेर', प्राजक्ता शुक्रेला दिल्या शिव्या, अनुश्री मानेला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Last Updated:

बिग बॉस मराठी 6 मध्ये अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यात जोरदार वाद, अनुश्रीने शिव्या दिल्याने घरात तणाव निर्माण झालाय. नेटकऱ्यांनी अनुश्रीला बाहेर काढण्याची मागणी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. "दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!" या थीमसह सुरू झालेल्या या पर्वात सदस्यांमधील नात्यांचे पदर आता वेगळ्या वळणावर येताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरात चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. अनुश्रीचा राग इतका अनावर झालाय की तिनं थेट प्राजक्ताला शिव्या दिल्या आहेत. घरातील ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्री यांच्यात जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळतंय.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असतात. मात्र यंदा हे वाद टोकाला गेले आहेत. प्रोमोमध्ये प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसत आहेत. अनुश्रीचे म्हणणे आहे, "आम्ही ड्युटी नाही करणार," अशा भूमिकेपासून सुरू झाले हा वाद.

( फोटोसाठी हात कापला, मग त्याच रक्ताने काढलं चित्र; राधा पाटीलने सांगितला पुण्यातील फॅनचा खतरनाक अनुभव )

advertisement

त्यावर प्राजक्ता म्हणाले, काय 'मूर्ख आहे यार... आणि त्यावर अनुश्री म्हणाली, हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे. गार्डन एरियामध्ये झालेल्या भांडणांनंतर प्राजक्ताने हे सगळं दिपालीला जाऊन सांगते. अनुश्रीने शिव्या दिल्या असं सांगते.  प्रमोमध्ये पाहायला मिळतंय की दिपाल प्राजक्ताने हे जाऊन सांगितल्यावर दीपाली अनुश्रीची विचारणा करायला आली, काय ग तू शिव्या देतेस? त्यावर अनुश्री म्हणाली, आईला घेऊन आलीस तू ? प्राजक्ता म्हणाली, अक्कल आहे का तुला? बावळट...

advertisement

इतकेच नाही तर, वादाच्या ओघात काही अश्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यमुळे घरातील वातावरण अधिकच तापले आहे. अनुश्रीने घातलेल्या शिव्या एपिसोडमध्ये बिप करण्यात आल्या आहेत. आता या शिव्यांवरून घरात काय राडा होणार हे आजच्या भागात कळणार आहे.

याआधी अनुश्रीचं राकेश बापटबरोबर देखील भांडण झालं. राकेशने मला न विचारता हात लावला यावरून तिने घरात धिंगाणा घातला. अनुश्रीने थेट राकेशच्या कॅरेक्टरवर डाऊट घेतला. त्यानंतर घरातील सगळे अनुश्रीच्या विरोधात गेले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

अनुश्रीने प्राजक्ताला शिव्या दिल्यानंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे. नेटकऱ्यांनी अनुश्रीला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. एका युझरनं लिहिलंय, "हाकला रे हिला घरा बाहेर". दुसऱ्याने लिहिलंय, "अनुश्री माने कुठे ही छपली माने कुठे." तिसऱ्याने लिहिलंय, "या आठवड्यात अनुश्रीला पाहताना असं वाटतंय की तिचा अहंकार खूपच वाढलाय. बोलण्याची भाषा तर एकदमच विचित्र आणि खालच्या पातळीची झाली आहे." आणखी एकाने लिहिलंय, "अनुश्री माने या आठवड्यात बाहेर जाणार."

मराठी बातम्या/मनोरंजन/
'हाकला रे हिला घरा बाहेर', प्राजक्ता शुक्रेला दिल्या शिव्या, अनुश्री मानेला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल