TRENDING:

आजवर कधीच दिसलं नाही ते 'बिग बॉस' दाखवणार! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिल्यांदाच चुगलीचं दार उघडणार आहे. ज्यामुळे टोळीतील सदस्यांचा खरा चेहरा त्यांच्यासमोर येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आपण सदस्यांना गॉसिपिंग करताना पाहतो. आजवर टोळी विरुद्ध ग्रुप असंच गॉसिपिंग आपण पाहत आलो आहोत. पण हे सदस्य आपल्या टीममधीलही सदस्यांबाबत गॉसिपिंग करतात. हेच बिग बॉसने उघड केलं आहे. बिग बॉसने पहिल्यांदाच चुगलीचं दार उघडलं आहे आणि टोळीतील सदस्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे.
News18
News18
advertisement

चुगलीचं दार उघडणार, टोळीवर गुगली पडणार असा हा भाऊचा धक्क्याचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात टोळीतील सदस्य एकमेकांविरोधातच काय काय बोलतात हे दाखवलं आहे. सदस्याला आत पाठवलं जातं आणि त्याच्याविरोधात कोण कोण बोलत आहे, ते दाखवलं जातं. प्रोमोत अनुश्री, रुचिता, विशालचं खरं रूप दिसतं.

Bigg Boss Marathi 6 : राखीपाठोपाठ अभिजीत बिचुकलेही पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात, Wild Card Entry? Watch Video

advertisement

अनुश्री तन्वीशी बोलताना दिसते. "मला विशालच्या विरोधात जायचं आहे". यावर विशाल "आपलेच दात आणि आपलेच ओठ असं वाटतंय" अशी प्रतिक्रिया देतो. यानंतर विशाल आणि रुचिता रोशनबद्दलचं बोलणं दाखवण्यात आलं आहे. रुचिता बोलते, "रोशन दादाला नाही कळत गेम तेवढा" यावर विशाल बोलतो, मला त्याचा भार घेऊन चालायचं नाहीये पुढे" हे ऐकल्यानंतर रोशनला खूप वाईट वाटतं. तो बोलतो, "कुठेतरी मन दुखलं आता"

advertisement

शेवटी टोळी एकत्र बसलेली दिसते आणि तेव्हा रोशन तिथून उठतो, मी टिम सोडून राहिलो आजपासून, आतापासून. असं तो म्हणतो चुगलीचं दार उघडणार...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

टोळीतील सदस्यांनी आजवर जे पाहिलं नव्हतं ते बिग बॉसने त्यांना दाखवलं आहे. प्रेक्षकांनी प्रोमोवर कमेंट करताना हा जबरदस्त ट्विस्ट असल्याचं म्हटलं आहे. टोळीमध्ये फूट पडणार!, असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. आता खरंच टोळी फुटणार का? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
आजवर कधीच दिसलं नाही ते 'बिग बॉस' दाखवणार! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल