TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : आsss आsss देवाsss ! अचानक ओरडू लागले, अक्षरश: कळवळले; बिग बॉसच्या घरातील पुरूषांना झालं काय?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात आता महिला जास्त आणि पुरूष फक्त तिघेच उरले आहेत. घरातील या तीन पुरूषांना झालं काय? अचानक ओरडू लागले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीच काही ना काही वेगळं आणि अनपेक्षित घडत असतं. पण यावेळी घरात असं काही घडलं ज्यामुळे सगळ्यांचीच अवस्था बघण्यासारखी झाली. विशेष म्हणजे घरातील पुरूष स्पर्धक अक्षरशः ओरडताना, पळताना आणि कळवळताना दिसले. यामागचं कारण ऐकून तुम्हालाही हसू येईल.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठीच्या घरात कधी भांडणं, कधी हास्याचे फवारे उडताना दिसतात. यावेळी घरात भन्नाट मजा-मस्ती पाहायला मिळाली ज्यामुळे सगळेच अक्षरशः हसून लोटपोट झाले. पण या मजा-मस्तीमध्ये घरातील पुरूष स्पर्धकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

( Bigg Boss Marathi 6 : लांब व्हा! टिकिट टू फिनालेसाठी त्या दोघांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले )

advertisement

पुरूष स्पर्धकांना महिलांना दरवेळी सहन करावा लागणारा त्रास अनुभवायला मिळाला. ही मज्जा मस्ती सुरुवातीला मजेशीर वाटली पण नंतर खूरच वेदनादायक ठरला. बिग बॉसच्या घरात आता महिला जास्त आणि पुरूष फक्त तिघेच उरले आहेत. महिला स्पर्धकांनी पुरूषांना अद्दल घडवण्याचं ठरवलं. पुरूषांचं वॅक्सिंग करत चांगलीच धांदळ उडवून दिली. Waxing मुळे बिग बॉस मराठीच्या घरातील मुलांना बाईपणाचे कष्ट कळले.

advertisement

समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, अनुश्री आणि राखी यांनी विशालला पकडलं आणि त्याच्या हाताचं वॅक्सिंग सुरू केलं. पहिल्याच पट्टीत विशालची अवस्था बिकट झाली. "आत्मा बाहर आ गया" अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली. त्याचा हा रिअॅक्शन पाहून घरातील सगळेच खळखळून हसू लागले.

यानंतर सागरची पाळी आली. त्याला स्विमिंग पूलजवळ बसवण्यात आलं. राखी आणि तन्वी यांनी त्याच्या हाताचं वॅक्सिंग केलं. प्रत्येक वेळी पट्टी काढताना तो "आsss आsss देवाsss" असं ओरडत तो कळवळू लागला. राकेशलाही या मजा-मस्तीपासून सुटका मिळाली नाही. त्याच्या पायाचं वॅक्सिंग करण्यात आलं. पण वॅक्सिंग होताच राकेश अक्षरशः उड्या मारत घरभर पळू लागला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेती करावी तर अशी, पारंपरिक पद्धतीला फाटा देत केली हुरडा ज्वारी लागवड, आता लाखांत कमाई
सर्व पहा

या संपूर्ण प्रकारात घरात एकीकडे हशा पिकला होता तर दुसरीकडे पुरूष स्पर्धकांना महिलांना दरवेळी सहन करावा लागणारा त्रास किती कठीण असतो हे देखील कळलं.  शेवटी विशालने कॅमेरासमोर हात जोडले.  "हे जे जे मुली करतात त्यांना सांष्टांग नमस्कार."  बिग बॉस मराठीच्या घरातील ही मजा-मस्ती प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आsss आsss देवाsss ! अचानक ओरडू लागले, अक्षरश: कळवळले; बिग बॉसच्या घरातील पुरूषांना झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल