बिग बॉस मराठी 6 चा चौथा आठवड्याचा शेवट जवळ आला. आठवड्याचा शेवट म्हणजे एव्हिक्शन आलं. घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार. पण या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरातील फक्त एक नाही तर एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत.
'शाळा'मधील 'मुकुंद जोशी'ला खऱ्या आयुष्यात 'शिरोडकर' भेटली! अभिनेत्रीसोबत बांधतोय लग्नगाठ
advertisement
बिग बॉसच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये बिग बॉसने आपला हा मोठा निर्णय जाहीर केल्याचं दिसतं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता घरातील सगळे सदस्य एकत्र बसले आहेत. बिग बॉस विचारतात की आज सकाळपासून कोणी कोणी नियम मोडले. यावेळी घरातील आताचा कॅप्टन असलेला सागर कारंडे सगळ्यांनीच मोडलेत असं सांगतो.
यानंतर बिग बॉस म्हणतात, "याआधी बिग बॉसने खूप संधी दिली आहे. आता बिग बॉस मोठा निर्णय घेत आहेत. आता एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील. शेवटचे काही तास उरलेत"
बिग बॉसचं हे वाक्य ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. आता घरातून बाहेर काढणारे ते सदस्य कोण असणार आहेत? हे एपिसोडमध्येच पाहायला मिळेल.
