"दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!" असं म्हणत बिग बॉस मराठी 6 चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या सीझनच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा हा प्रोमो आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. "फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…" अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सीझनचा बार उडवला आहे. नक्की दारा पलीकडे काय ट्विस्ट असणार? ? सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार? कोण होणार पास तर कोण होणार फेल? या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत.
advertisement
( सचिन पिळगांवकर म्हणजे 'सांतारूपी माणूस', ऑनस्क्रिन लेकीकडून कौतुक थांबेना )
प्रत्येक प्रोमोमध्ये रितेश भाऊ प्रेक्षकांना काहीतरी नवं देतच असतो. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाईल, खास स्वॅग हे त्यांच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडले आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सीझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता भाऊ आपल्या एका हटके लूकमध्ये दिसत आहे. "ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ" प्रोमोमधील भाऊंच्या ओळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. रात्री 8 वाजता सीझनचा प्रीमियर होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनेक कलाकारांनी आणि इन्फ्लुएन्सर्सची नावं बिग बॉस मराठीसाठी चर्चेत आहेत.
