TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना रडवणारी राखी प्रभूसाठी ढसाढसा रडली; मिठी मारली आणि म्हणाली, 'मी तुझ्यासाठी...'

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांची वाट लावणार, सगळ्यांना डसणार असं म्हणत नागिण अवतारात बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्रीने आलेली राखी सावंत पहिल्यांदाच रडताना दिसली आहे. तेही प्रभूसाठी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यापासून राखी सावंतने अक्षरश: सदस्यांच्या नाकात दम केला आहे. सगळ्यांना रडायला लावणारी बिनधास्त अशी ही राखी आता पहिल्यांदाच रडली आहे, तीसुद्धा प्रभूसाठी. प्रभूला मिठी मारून ती ढसाढसा रडली आणि तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी प्रभूसाठी रडताना दिसली आहे. प्रोमोत सुरुवातीला राखी प्रभूला तन्वीविरोधात भडकवताना दिसते. त्यांची ताटातूट करते. राखीच्या सांगण्यावरून प्रभू तन्वीची साथ सोडतो आणि राखीजवळ जातो. राखी त्याला आपल्या मिठीत घेते आणि रडते.

'बेडजवळ भोक, जिवंत माणसाचा पाय दिसला'; आस्ताद काळेनं सांगितलं Bigg Boss च्या घरातील पडद्यामागचं गूढ

advertisement

राखी प्रभूला सांगते पल्लू पकडायला नाहीस तू इथं, यावर तन्वी म्हणते काय ही बेसलेस बोलते आहे. यानंतर राखी प्रभूला सांगते ऐकलं स्वत:साठी खेळ. यावर प्रभू म्हणतो. एकही डिसीझन घेत नव्हते काय करू मग एकटा. असं म्हणत प्रभू राखीजवळ जाते. राखी त्याला आपल्या जवळ घेते आणि मिठी मारून रडते.

तन्वी त्याला म्हणते तुला वाटत असेल तू माझा पदर पकडून असतोस तर उद्यापासून पदर पकडू नको माझा. यानंतर बेडरूममध्ये राखी आणि प्रभू यांच्यातील बोलणं दाखवण्यात आलं आहे. राखी प्रभूला सांगते तू कॅप्टन बनवलं आहेस तिला. तुला युझ करतात. सॉरी मी काही करू शकत नाही तुझ्यासाठी, असं म्हणत राखी ढसाढसा रडते. रडताना तिचा आवाजही बसलेला ऐकू येतो. यानंतर प्रभूही खूप रडतो. सोफ्यावर बसून तो मान खाली घालून रडताना दिसतो.

advertisement

Bigg Boss Marathi 6 : एकीकडे विशालवर प्रेम, दुसरीकडे राकेशसोबत 'गुटर गूं'; 'बिग बॉस'च्या घरात रुचिताचं चाललंय काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

प्रभू आणि तन्वी दोघं आजवर एकमेकांसोबत राहिलं. त्यांच्यात गप्पाही रंगायच्या. तन्वीने नुकतंच प्रभूला राखी चांगली असल्याचं सांगितलं होतं. मी स्वत:ला राखीमध्ये पाहते. मी तिच्यासारखीच आहे, असंही ती म्हणाली होती. यानंतर ज्याच्यासोबत तन्वी जास्त असायची आणि ज्या राखीला तिने चांगली म्हटलं त्या दोघांनीही तिचा जणू केसाने गळा आवळला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना रडवणारी राखी प्रभूसाठी ढसाढसा रडली; मिठी मारली आणि म्हणाली, 'मी तुझ्यासाठी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल