बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सगळ्यात जास्त भांडखोर कोण असतील तर त्या म्हणजे अनुश्री आणि रुचिता. दोघी एका टोळीतील. दोघीही सतत अगदी टोकाच्या लेव्हलला सगळ्यांशी वाद घालताना दिसल्या आहेत. आता या अशा तलवारी एकाच म्यानात राहिल्या तर... काय होईल? हेच आता आपल्याला पाहायला मिळत आहे. नव्या एपिसोडचा प्रोमो ज्यात अनुश्री आणि रुचिता भांडताना दिसल्या आहेत. फुसके, बिंडोक, बावळट असे शब्द वापरत एकमेकींवर त्यांनी चिखल उडवला आहे.
advertisement
अनुश्री आणि रुचितामध्ये काय वाद झाला पाहुयात.
रुचिता : मला जेव्हा जे बोलायचं आहे, ते मी बोलणार.
अनुश्री : अगं, प्रत्येक वेळी अशी तलवार काढून खेळायची गरज नसते.
रुचिता : अगं ए फुसके हे तुझे टॅक्टिक्स आता घराबाहेर चालव.
अनुश्री : बावळट, बिनडोक, तू तुझी काशी कर.
रुचिता : तू तुझी काशी कर... आणि हा वाद सुरूच राहिला.
आता हा वाद नेमका कशामुळे पेटला हे आजच्या एपिसोडमध्ये समजेलच. पण आता टोळीच युद्ध भडकल्याने घरातील वातावरण बदलणार हे नक्की.
'बिग बॉस'च्या घरात कोल्हापुरी बाणा आणि सातारचा ठसका
अनुश्री आणि रुचिता यांनी 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात एकापाठोपाठ एक धमाकेदार एन्ट्री घेतली होती. होत आहेत. साताऱ्याची अनुश्री माने आणि कोल्हापूरची रुचिता जामदार या दोघींनी 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवले आहे. या दोन ग्लॅमरस स्पर्धकांच्या एन्ट्रीमुळे घरातील चुरस आता अधिकच वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रुचिता एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे, विशेषतः आपल्या डान्ससाठी ती चाहत्यांमध्ये ओळखली जाते. अनुश्री माने ही सोशल मीडियावरील एक अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. तिचे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओ तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत.
रुचिता तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. मंचावर रितेश देशमुखशी गप्पा मारताना ती म्हणाली, "छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरची लेक आहे. छुईमुई बाहुली नाही तर वाघिण आहे. थेट अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आले आहे. त्यामुळे यावेळेस लढायला मजा येणार आहे" तर "मुंबईत ट्रॉफी निघतेय, तर ती साताऱ्यालाचं थांबणार" असं म्हणत अनुश्री मानेनेदेखील आपले इरादे स्पष्ट होते.
त्यावेळी 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापुरी बाणा आणि सातारचा ठसका यांची जुगलबंदी पाहायला मिळणार असं वाटलं होतं, ते आता चौथ्या आठवड्यात दिसतं आहे.
