बिग बॉस मराठी 6 चा चौथा आठवडा, 25 वा दिवस... नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. सागर आणि तन्वी यांच्यात किचनमध्ये भांडण झालं. त्यांच्या रागाचा प्रेशर कुकर फुटल्याचं दिसतं आहे. नेमकं सागर आणि तन्वीमध्ये काय वाद झाला ते पाहुयात.
तन्वी : तू मला का बोलतो सारखं सारखं.
सागर : तू मला सारखं बोलतेस
advertisement
तन्वी : तू माझ्याशी अरेरावीतच बोलतोच बघावं तेव्हा.
सागर : मी अजिबात अरेरावी केलेली नाही.
तन्वी : तू राग काढतोयस, माणुसकीला तरी जाग.
यात सागर मधे मधे बोलायचा प्रयत्न करतो पण तन्वी काही ऐकूनच घेत नाही. माझ्याशी असं नाही बोलायचं असं म्हणत ती सरळ तिथून निघून जाते. सागर म्हणतो, दरवेळची हिची ही नाटकं आहेत यार.
सागर आणि तन्वीमध्ये आधीही भांडण
सागर आणि तन्वीतील हे भांडण पहिल्यांदाच नाही. याआधी बिग बॉस मराठी सहावा सीझन सुरू झाल्यानंतर चौथच्या दिवशी त्यांच्यात वाद झाला होता. कॅप्टन्सीपदाच्या उमेदवारीसाठी टास्क सुरू होता. या टास्कमध्ये सागर आणि तन्वी विरुद्ध टीममध्ये खेळत होते. सागर तन्वीबद्दल इतर सदस्यांशी काहीतरी बोलत होता. ते तन्वीने ऐकलं आणि तिने सागरला सुनावलं. ती त्याला अरेतुरे करायला लागली.
बोलता बोलता तन्वी सागरला म्हणाली, 'कॉमेडी करून लोकांची भांडणं मिटवतो!' हे ऐकताच सागरचा संयम सुटला. त्याचा आवाज वाढला, "माझं प्रोफेशन आहे ते. त्यावर जायचं नाय. प्रोफेशन काढते म्हणजे काय... असशील तू मोठी घरी", असं सागर म्हणाला. त्याने मोठ्या आवाजात तन्वीची शाळा घेतली. त्यामुळे तन्वी आतमध्ये जाऊन रडायला लागली.
Radha Patil Struggle : बॅक डान्सर ते लीड रोल! अंबरनाथची राधा पाटिल कशी झाली कातिलो की कातिल
त्यावेळी प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनीही तन्वीला ट्रोल केलं आणि सागरची बाजू घेतली होती. आता पुन्हा सागर आणि तन्वीमध्ये भांडण नेमकं कशावरून झालं हे एपिसोडमध्येच समजेल. पण हा प्रोमो पाहिल्यावर लोक सागर कारंडेवर भडकले आहेत. सागर कारंडे आतल्या गाठीचा आहे, डबल ढोलकी आहे, दिसतो तसा नाही, खूपच बेकार आहे, अशा कमेंट नेटिझन्सनी केल्या आहेत.
