TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या डोक्यात गेली राखी सावंत, लावली वाट! हात धरून खेचत घराबाहेर काढलं, पण का?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या सहाव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने मोठा धक्का दिला आहे. बिग बॉसने राखी सावंतला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राखीसह घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकही शॉक झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या पाचव्या आठवड्याच्या शेवटी रविवारी भाऊच्या धक्क्यावर आयुष संजीव आणि करण सोनावणे हे दोन सदस्य घराबाहेर गेले. आता सहावा आठवडा. या आठवड्यात काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तोच आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने मोठा धक्का दिला आहे.
News18
News18
advertisement

एव्हिक्शन आठवड्याच्या शेवटी होतं. पण आठवड्याच्य सुरुवातीलाच घरातील एका सदस्याला बिग बॉसने बाहेर काढणार आहेत. हा सदस्य दुसरा तिसरा कुणी नाही तर राखी सावंत आहे. आठवडाभरापूर्वीच राखी सावंतची बिग बॉस मराठी 6 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झाली. यानंतर घरातील सदस्यांची बोबडी वळली आणि प्रेक्षकांना बिग बॉस पाहायला मजा वाटू लागली. तिने घरातील सदस्यांच्या नाकात दम करून ठेवला. पण आता राखीचं घरातील कृत्य पाहून बिग बॉसही भडकले आहेत.

advertisement

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचं झालंय ब्रेकअप! रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच सांगितलं, कोण होता तिचा बॉयफ्रेंड?

बिग बॉसच्या नव्या प्रोमोत बिग बॉस राखीवर भडकलेले दिसत आहेत. ते राखीला म्हणतात, "राखी मी नाराज आहे". यावर राखी हात जोडत त्यांची माफी मागते. यावर बिग बॉस म्हणतात, "आता बिग बॉस वाट लावणार" आणि तिला कन्फेशन रूममध्ये बोलवतात. राखीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो.

advertisement

कन्फेक्शन रूममध्ये जातात राखी डोळे मिटून शांत बसते. एरवी बिनधास्त असणारी राखी सावंत यावेळी मात्र घाबरलेली दिसते.  बिग बॉस म्हणतात, "या घराची जी अवस्था आहे, त्यामुळे आपल्यावर अॅक्शन घ्यायचं ठरवलं आहे", असं बिग बॉस तिला सांगतात. हे ऐकताच राखीला धक्का बसतो, "बिग बॉस मी काय केलं आहे", असं विचारते.

प्रेमाचं अंकुर फुलण्याआधीच कोमेजलं! करण घराबाहेर होताच प्राजक्ता कोसळली, बाल्कनीत एकटीच बसून ढसाढसा रडली, PHOTO

advertisement

यानंतर बिग बॉस टिमला राखीला बाहेर काढण्याचा आदेश देतात. दोन लोक येतात आणि राखीचे दोन्ही हात धरून खेचून बाहेर नेताना दिसतात. राखी रडते, हात जोडते, "मला राहायचं आहे, नाही नाही नाही", असं म्हणताना ऐकू येतं. घरात राहण्यासाठी ती धडपड करताना दिसते. राखीबाबत बिग बॉसने घेतलेला हा कठोर निर्णय ऐकून घरातील सगळ्या सदस्यांना धक्का बसतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

आता राखीने असं काय केलं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. प्रोमोमध्ये राखी बेडवर कचरा टाकताना तसंच एक जळलेलं भांडं दाखवताना दिसते. आता नेमकं राखीने काय केलं आहे, ज्याची इतकी मोठी शिक्षा तिला मिळाली आहे आणि खरंच बिग बॉस राखीला घराबाहेर काढणार का? हे येणाऱ्या एपिसोडमध्येच समजेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या डोक्यात गेली राखी सावंत, लावली वाट! हात धरून खेचत घराबाहेर काढलं, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल