अजित कुमार, त्रिशा कृष्णन आणि अर्जुन दास यांचा बहुचर्चित तमिळ अॅक्शन चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ प्रेक्षकांसमोर आला आणि एका वेगळ्याच वादात सापडला. अधिक रविचंद्रन दिग्दर्शित हा सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जगभरातून मिळून या चित्रपटाने फक्त 248.2 कोटी कमावले. यामुळे निर्मात्यांना जवळपास 250 कोटींचे नुकसान सहन करावे लागले.
advertisement
'प्रियांका चोप्राचं सुपरस्टारसोबत सीरियस अफेअर' प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली 'आतली गोष्ट'
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर, निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 8 मे 2025 रोजी ‘गुड बॅड अग्ली’ नेटफ्लिक्सवर तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला. सुरुवातीला या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये जागा मिळवली.
याचवेळी मोठी समस्या उद्भवली. चित्रपटात संगीतकार इलैयाराजाची तीन गाणी त्यांच्या परवानगीशिवाय वापरली गेल्याचे समोर आले. इलैयाराजाने थेट न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर नेटफ्लिक्सला हा सिनेमा तात्काळ काढून टाकावा लागला. त्यामुळे ‘गुड बॅड अग्ली’ आता नेटफ्लिक्स इंडियावर उपलब्ध नाही.
या चित्रपटाची कथा अजित कुमारच्या ए.के. नावाच्या अंडरवर्ल्ड डॉन भोवती फिरते. त्रिशा कृष्णन आणि अर्जुन दास यांच्या दमदार भूमिकांनी सिनेमाला स्टारपॉवर मिळाली, पण कथानक आणि सादरीकरणावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.