अभिनेता त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवखा होता. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्यावेळी शूटींगच्या सेटवर एक अपघात झाला आणि मला माझे करियर सुरु व्हायच्या आधीच संपले असे वाटले. अभिनेत्री श्रीदेवीने फरहानला काहीतरी सांगितले ज्यामुळे त्याचा जीवात जीव आला. तो खूप घाबरला होता.
advertisement
घसरुन पडली श्रीदेवी
फरहान अख्तरने 'आप की अदालत' शो मध्ये हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, "माझे दुर्भाग्य की एक छोटा अपघात झाला होता. 'लम्हे' चित्रपटाच्यावेळी मी मनमोहन सिंह यांचा सातवा आठवा असिस्टंट होतो. हा एक टिपिकल यश चोपडा सेट अप होता. कोरिओग्राफर सरोज खानने एक खूप जास्त एनर्जी असणारा डांस सीक्वेन्स उभा केला होता."
"सीन हा होता की श्रीदेवीला काहीतरी वाइट बातमी समजते आणि तिला तिच्या डान्स मधून राग आणि तिची वेदना दाखवायची असते. शेवटचा क्रेन शॉट व्हायचा होता. तेव्हा श्रीदेवी रिहर्सल करत होती. मनमोहन सिंह फ्रेम चेक करत होते. तिथल्या फरशीवर डाग होता जो त्यांनी साफ करायला सांगितला. मी तिथे जवळ असल्याने मीच गेलो साफ करायला. त्या घाईमध्ये श्रीदेवी येत होत्या, ते मी पाहिले नाही. मी खाली वाकून सफाई करत होतो. तेव्हाच श्रीदेवी आल्या आणि जमिनीवर घसरुन पडल्या. सेटवर पूर्ण शांतता पसरली. मला वाटलं संपलं माझं करियर."
श्रीदेवी काय म्हणाली ?
फरहान म्हणाला, "श्रीदेवी न रागवता हसल्या आणि टाळत मला म्हणाली, 'काही नाही हे असं होतं' हे ऐकूण सगळे लोक तिकडचे हसायला लागले. त्यानंतर मी सुखाचा श्वास घेतला."
