मृणाल ठाकूर जिने 'कुमकुम भाग्य' या मालिकेपासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हिंदी, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत तिथंही आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती धुळ्यातील आहे, जिचा जन्म धुळ्याचा. मराठी भाषेतील पोटभाषा अहिराणी. जी खान्देशची मायबोली. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकच्या काही भागांमध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. त्यामुळे धुळ्याच्या असेलल्या मृणालला अहिराणी खूप छान येतं. इतर भाषांच्या फिल्ममध्ये काम केलं तरी ती आपली मायबोली अहिराणी विसरली नाही.
advertisement
मृणाल ठाकूरला व्हिडीओत एक पत्रकार प्रश्न विचारायला जाते. तेव्हा मृणाल ठाकूर आपल्याला अहिराणी येत असल्याचं अहिराणी भाषेत सांगते. तेव्हा पत्रकारही तिला अहिराणी भाषेतच प्रश्न विचारते आणि मृणाल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अहिराणीत देते. यामध्ये ती तिच्या आवडीचे पदार्थही सांगते.
अहिराणी आता या भाषेचं वेड फक्त खान्देशापुरता मर्यादित नाही तर राज्य आणि राज्याच्या बाहेरही गेलं आहे. याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर तुम्हाला बरीच अहिराणी गाणी पाहायला मिळतील. जी कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. कित्येक लग्नांमध्येही, हळदीला, वरातीत ही गाणी वाजतात. देख तुनी बायको, हाय झुमका वाली पोर ही गाणी तुम्ही ऐकलीच आहेत, हीच अहिराणी भाषा.
अहिराणी भाषेतील ही गाणी तुम्हाला आवडलीच असतील ना, आता मृणाल ठाकूरचा हा अहिराणी भाषेतील संवाद आवडला की नाही? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अहिराणी भाषेतच मृणालचं कौतुक केलात तर अधिकच चांगलं.
