TRENDING:

Aishwarya Rai - Rakhi Sawant Movie : ऐश्वर्या रायसोबत राखी सावंतने केलेला चित्रपट, आयटम साँगही नाचली? तो पिक्चर कोणता!

Last Updated:

Rakhi Sawant : राखी सावंतने एका मुलाखतीदरम्यान खूलासा केला की मी ऐश्वर्या रायसोबत काम केले, पण तो चित्रपट कधीच रिलीज झाला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री राखी सावंत बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' म्हणून फेमस आहे. ती कोणत्या ना कोणत्यातरी वक्तव्याने कायम चर्चेत असते. तिचे बोलणे म्हणजे डायरेक्ट घणाघातच असतो. ती अनेक सिनेमात आयटम साँग करताना दिसली आहे. अनेक मोठमोठ्या स्टार कलाकारांसोबत तिने काम केले आहे. तिने हल्लीच एक मोठे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली. तिने एका चित्रपटात ऐश्वर्या राय सोबत काम केले होते, याचा खुलासा एका मुलाखती दरम्यान तिने केला.
News18
News18
advertisement

राखी सावंतने काय केला खूलासा ?

बॉलिवूड बबलसोबत मुलाखतीमध्ये अभिनेत्री राखी सावंत म्हणाली, " मी ऐश्वर्या राय सोबत एक चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचे नाव होते 'राधे श्याम'. पण तो चित्रपट कधी रिलीज झाला नाही." तिला विचारले की एवढी मोठी स्टार कास्ट असतानाही चित्रपट रिलीज का झाला नाही ? त्यावर राखी म्हणाली, "या चित्रपटाचे निर्माते होते, त्यांचे कोविडमध्ये निधन झाले. त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाला नाही. हा चित्रपट रिलीज झाला असता तर मोठे नाव झाले असते. तरीही माझे नाव अजूनही मोठे आहे."

advertisement

25 लाखांच्या या प्रश्नावर अडकला स्पर्धक, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

ऐश्वर्या राय आणि सुनील शेट्टी होते या चित्रपटात

पूढे ती म्हणाली, "मी छोट्या छोट्या मालिका आणि प्रोजेक्ट्स केले आहेत. त्यासोबतच ऐश्वर्या रायसोबत अनरिलीज चित्रपटात काम केले आहे. पण तो खूप चांगला चित्रपट होता. यात माझा आणि ऐश्वर्याचा एकत्र डान्स आणि आयटम साँगही होते. या चित्रपटात चक्क अभिनेते सुनील शेट्टीही आहेत. ज्यात सुनील शेट्टी आणि ऐश्वर्याचा डबल रोल दाखवला होता."

advertisement

"मी ऐश्वर्यापेक्षा कमी नाही.."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

मुलाखतीमध्ये राखी म्हणाली की, "मी ऐश्वर्या नाही, पण ऐश्वर्यापेक्षा मी कमी नाही. श्रीमंत लोकांना ती आवडते. पण मला पानवाले आणि ऑटो वाले लोक खूप पसंत करतात." या वक्तव्यामुळे ती सोशल मीडीयावर खूपच चर्चेत आली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya Rai - Rakhi Sawant Movie : ऐश्वर्या रायसोबत राखी सावंतने केलेला चित्रपट, आयटम साँगही नाचली? तो पिक्चर कोणता!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल