'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये रिलीज होणार असून त्याचा दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर, 'रामायण' चित्रपट महाभारतावर आधारित आहे. अद्याप चित्रपटातील एकाही कलाकाराचा लूक निर्मात्यांनी रिव्हिल केलेला नाही. दरम्यान, एका वेबसाईटने रणवीरचा चित्रपटातला लूक रिव्हिल केलेला आहे. तोच आता सोशल मीडियावर दिग्दर्शकांना आणि रणवीरला प्रभू श्री रामाच्या लूकवरून नेटकरी ट्रोल करीत आहेत.
advertisement
रेडिफवर रणवीरचा प्रभू श्री रामाच्या भूमिकेतला लूक व्हायरल होतोय. 'झूम' या वेबसाईटने 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूरचे प्रभू श्री रामाच्या अवतारातले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो शुटिंगवर परतताना दिसत आहे. या लूकमध्ये रणबीरने भगव्या रंगाचा धोतर वेअर केलेला दिसत आहे. पण अभिनेत्याच्या चित्रपटातल्या लूकवर नेटकरी पूर्णपणे खूश नाहीत. "एवढे मोठे बजेट असूनही, दिग्दर्शक एक चांगला विग सुद्धा लावू शकले नाहीत का?", असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, रणवीरचा हा फोटो केव्हाचा आहे? याचा खुलासा झालेला नाही. 'रामायण' चित्रपटाचे बजेट 4000 कोटी असल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याचा चित्रपटातला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चित्रपटामध्ये वापरलेल्या विगबद्दल नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहे. रेडिटवर रणबीरचा लूक समोर आल्यानंतर, बॉलिवूड ड्युप्लिकेट केस आणि दाढी वापरण्यात खरोखरच वाईट असल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, असं दिसतंय की तुम्ही 'आदिपुरुष'कडून काहीही शिकलेले नाही. तर, काही लोकांनी चित्रपटाच्या लूकवरून दिग्दर्शकाला आणि अभिनेत्याला ट्रोल करणं चुकीचं आहे. ट्रेलर येण्याची वाट पाहूया, असं काही फॅन्सचं म्हणणं आहे.
