छत्रपती संभाजीनगरातील कुंभेफळमध्ये सुकन्या सावंत राहतात त्यांचा शिक्षण हे MCA झालेला आहे. त्या गृहिणी आहेत. चार ते साडेचार वर्षांची यशस्वी नावाची मुलगी देखील आहे. तर तिच्यासाठी हा चित्रपट तयार केलेला आहे. आपण यूट्यूब किंवा इतरही सोशल मीडियावरती बघतो की मराठी कंटेंट कमी प्रमाणामध्ये आहे आणि या लहान मुलांना पण मोबाईल पासून दूर ठेवू शकत नाही पण यांना आपण छान असं मोबाईलच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी दाखवू शकतो यासाठी मी हा चित्रपट तयार केलेला आहे.
advertisement
संपूर्ण चित्रपट मी हा मोबाईल आणि लॅपटॉप वरती तयार केलेला आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या सासूबाई त्यांचा नवरा यांनी खूप अशी मदत केलेली आहे. सुकन्या सांगतात की यासाठी मला खर्च आलाय पण या चित्रपटापुढे हा खर्च काहीच नाही आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना एकदम चित्रपट त्यांनी तयार केला आहे. यासाठी त्यांनी खूप असा अभ्यास केला, खूप अशी पुस्तकं वाचली, मुलाखती ऐकल्या, मोठं इतिहासकारांच्या आणि त्यानंतर त्यांनी हा संपूर्ण चित्रपट तयार केलेला आहे. शॉर्ट फिल्म सारखा हा चित्रपट असणार आहे. येता 12 जानेवारी रोजी हा चित्रपट संभाजीनगर मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.