एवढेच नाही तर हरियाणवी पोलिसांनी गायकाविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी केली. परिस्थिती चिघळताना पाहून बादशाहने माफी मागणं योग्य मानलं. मी माझ्या संगीताद्वारे लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, कोणालाही दुखावत नाही असं त्यानं म्हटलं. इतकंच नाही तर हरियाणवी समजून मला माफ करा असं त्याने म्हटलं.
advertisement
'तत्तीरी' या हरियाणवीच्या गाण्याच्या शब्दांवरून आणि सीन्सवरून निर्माण झालेल्या वादात बादशाहने माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांसमोर हात जोडले आहेत. हरियाणवी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल त्याने माफी मागितली.
व्हिडिओमध्ये बादशाह म्हणाला, "नमस्कार मित्रांनो, मी बादशाह आहे. माझे नवीन गाणे 'तत्तीरी' रिलीज झाले आहे आणि मी पाहत आहे की माझ्या शब्द आणि सीनमधून मिळालेला संदेश अनेक लोकांना, विशेषतः माझ्या स्वतःच्या गावी हरियाणातील लोकांना दुखावलं आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की मी हरियाणाचा आहे. माझी बोलीभाषा, खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि ओळख हे सर्व हरियाणात रुजलेले आहे. मी अभिमानाने म्हणतो की मी हरियाणवी आहे."
बादशाह पुढे म्हणाला, "हिप-हॉप शैलीमध्ये कॉम्पेटिटर्सना तुच्छ लेखण्यासाठी अनेकदा गाण्यांचा वापर केला जातो. हे कधीही कोणत्याही महिलेसाठी किंवा मुलासाठी नव्हते आणि मी कधीही असे करणार नाही. मी नेहमीच हरियाणाची संस्कृती आणि बोलीभाषा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जर कोणी दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो. मला आशा आहे की तुम्ही मला हरियाणाचा मुलगा, तुमचा स्वतःचा मुलगा समजून मला माफ कराल."
हे गाणे 1 मार्च 2026 रोजी रिलीज झाले होते. ज्यामध्ये बादशाह सिमरन जगलनसोबत दिसला होता. हरियाणवी हिप-हॉप शैलीत बनवलेल्या या गाण्यातील काही शब्द आणि व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातील मुलींच्या शॉटमुळे सोशल मीडियावर या गाण्यावर जोरदार टीका झाली. अनेकांनी ते आक्षेपार्ह, अश्लील आणि महिलांचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं.
हरियाणा राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आणि बादशाहला समन्स बजावला. पंचकुला येथील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर जारी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
