TRENDING:

आधी कॅन्सर, मग गाठ... प्रचंड वेदनेत आहे दिपिका कक्कर, सर्जरीनंतर अश्रू अनावर, VIDEO

Last Updated:

दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरनंतर पोटात सिस्ट आढळली. तिची पुन्हा सर्जरी झाली. त्यानंतर कठीण काळातून ती जात आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत सगळ्यांबरोबर तिच्या भावना व्यक्त केल्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लोकप्रिय टीव्ही जोडी शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर पुन्हा एकदा कठीण काळातून जात आहेत. अभिनेत्री दिपिका कक्कर कॅन्सरशी झुंज देत आहे. आता दीपिका कक्करच्या पोटात एक नवीन सिस्ट असल्याचं समोर आलं. ज्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं.  स्टेज 2 लिव्हर कॅन्सर आणि गेल्या जूनमध्ये ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. आता या नवीन समस्येमुळे दिपिका आणि शोएब यांच्यावर नवं संकट आलं आहे. दिपिकाच्या सिस्टचं ऑपरेशन झालं आहे. पण दीपिका अजूनही काही वेदना सहन करत आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर दीपिकानं व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात.
News18
News18
advertisement

शोएबने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दीपिका तिच्या हॉस्पिटलच्या बेडजवळ हसत होती आणि शोएबची सावली तिच्या बाजूला उभी होती. ज्या दिवशी दिपिका रुग्णालयात होती तेव्हा त्यांच्या लग्नाचा बर्थडे होता. दोघांनी तो साधेपणाने साजरा केला.

( 'तो माझा होणार नाही...' 21 वर्षीय युट्यूबरनं आयुष्य संपवलं, डायरीत लिहिलं होतं धक्कादायक गूढ )

advertisement

दिपिका कक्करने यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले की, तिला 13 मिमीची गाठ होती. जी आरएफए नावाच्या प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु वेदना अजूनही आहे. दिपिका म्हणाली, "आम्ही काल रात्री घरी परतलो. संपूर्ण प्रक्रिया चांगली झाली. लोक तुम्हाला ते पुन्हा घडण्यासाठी तयार करतात. पण जेव्हा ते प्रत्यक्षात घडते तेव्हा ते सहन करण्यास वेळ लागतो. मलाही थोडा वेळ लागला. ते खूप अचानक घडले. डॉक्टर म्हणाले, सोमवारी अँडमिट व्हा आणि त्यादरम्यान आमची अँनिव्हर्सरी होती.

advertisement

दीपिका कक्कर म्हणाली, "यावेळी, जेव्हा मी सर्जरीसाठी जात होते तेव्हा मी खूप अस्वस्थ होते. मी खूप रडत होते. डॉक्टरांनी मला शांत केले. यावेळी सर्जरी ओटीमध्ये नाही तर सीटी रूममध्ये केली गेली. ही आरएफए नावाची सर्जरी आहे. जिथे त्यांनी माझे सिस्ट जाळले आणि ते खूप लहान असल्याने आम्ही ते अशा प्रकारे करू शकलो. जर ते मोठे असते तर प्रक्रिया अधिक कठीण झाली असती."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

दिपिका कक्कर ही आता 39 वर्षांची आहे. तिला एक मुलगा आहे.  जून 2025 मध्ये तिच्या कॅन्सरचं निदान झालं. तेव्हापासून तिच्यावर केमोथेरपी, त्याच्या वेदना, भावनिक चढ-उतार आणि रिकव्हरी सुरू आहे. या सगळ्याचे अपडेट ती युट्यूब व्हिडीओमधून देत असते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी कॅन्सर, मग गाठ... प्रचंड वेदनेत आहे दिपिका कक्कर, सर्जरीनंतर अश्रू अनावर, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल