आप्पांचा डॅशिंग लुक
हिम्मतराव म्हणजेच आप्पा यांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी या डान्ससाठी खास लुक तयार केला आहे. डोक्यावर स्टायलिश टोपी, गळ्यात मफलर आणि ट्रॅडिशनल अंदाजात ते गौतमीसोबत नाचताना दिसत आहेत. माधव अभ्यंकर यांनी यापूर्वी आण्णा नाईक यांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता हिम्मतरावच्या या नव्या अंदाजाने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गौतमीच्या लावणीच्या तालावर आप्पांचा हा डॅशिंग डान्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.
advertisement
( Usha Nadkarni: 'काम करताना मरण आलं पाहिजे..', उषा नाडकर्णीला अश्रू अनावर, असं का म्हणाल्या आऊ? )
गोपाळच्या टेलरिंग ओपनिंगला नकार, पण गौतमीसाठी तयार
मालिकेच्या कथानकात हिम्मतराव यांनी गोपाळच्या लेडीज टेलरिंगच्या ओपनिंगला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, गौतमीच्या डान्ससाठी ते खास तयार होऊन आले आहेत. ‘बाई वाड्यावर’ गाण्यावर त्यांनी गौतमीसोबत केलेला डान्स मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा डान्स मालिकेत नवा ट्विस्ट घेऊन येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गौतमीच्या लावणीने वाढवली मालिकेची उत्सुकता
गौतमी पाटील ही तिच्या लावणी आणि ठसकेबाज डान्ससाठी ओळखली जाते. तिची ‘देवमाणूस मधला अध्याय’ मालिकेतील एन्ट्री आणि हिम्मतराव यांच्यासोबतचा डान्स यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर या डान्स व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत आहे. चाहते गौतमी आणि आप्पा यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत.
आजच्या भागात काय आहे खास?
'देवमाणूस मधला अध्याय'च्या आजच्या भागात गौतमी आणि हिम्मतराव यांच्या डान्ससह मालिकेत काही नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. गौतमीच्या लावणीने मालिकेचा रंग अधिकच खुलणार आहे. प्रेक्षकांना हा भाग नक्कीच आवडेल, यात शंका नाही.