बिग बॉसच्या घरा फॅमिली विक पार पडणार आहे. यावेळी बिग बॉस डीपी दादांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. घरात डीपी दादांचे वडील येणार आहे. बाप-लेकाची ही गळाभेट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.
( 60 दिवसांनी बिग बॉसच्या घरात स्पेशल सदस्यांची एंट्री, अभिजीतचा 20 सेकंदाचा प्रोमो डोळ्यात पाणी आणेल )
advertisement
बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, बिग बॉस म्हणतात, एका सदस्याचं स्वप्न होतं की वडिलांनी आपलं कौतुक करावं आणि आज तो दिवस आला आहे. त्यानंतर डीपी दादांच्या वडिलांची घरात एंट्री होते. वडिलांना पाहून डीपी दादा रडू लागतात. बाप लेक एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागतात. बाप-लेकाचा हा भावुक क्षण पाहून प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी आलंय.
प्रोमोमध्ये पुढे डीपी दादांची आई आणि पत्नी देखील आल्याचं पाहायला मिळत आहे. आई आणि पत्नी देखील डीपी दादांनी मिठी मारून रडू लागतात. मला तुझा अभिमान आहे असं त्यांची आई म्हणते. तर बेडरूममध्ये डीपी दादा वडिलांचे पायही चेपताना दिसत आहेत.