60 दिवसांनी बिग बॉसच्या घरात स्पेशल सदस्यांची एंट्री, अभिजीतचा 20 सेकंदाचा प्रोमो डोळ्यात पाणी आणेल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'बिग बॉस मराठी'च्या घरात आजचा भाग खूप विशेष असणार आहे. प्रेक्षकांना ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती ते आज बिग बॉसच्या घरात घडणार आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन 100दिवसांऐवजी 70 दिवसातच संपणार आहे. त्यामुळे अनेक टास्क अनेक ट्विस्ट देखील कमी झालेत. घरात रंगाणारे अनेक फेमस टास्क होणार नाहीत. सीझन संपायला 14 दिवस बाकी असल्याने आता घरात फॅमिली विकही होणार नाही असं वाटतं होतं मात्र घरातील सदस्यांबरोबर प्रेक्षकांचीही इच्छा पूर्ण झाली आहे. अखेर सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात येणार आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरात आजचा भाग खूप विशेष असणार आहे. कारण आजपासून घरात फॅमिली वीक पार पडेल. आजच्या अभिजीत सावंतची फॅमिली त्याला भेटायला येणार आहे. बायको आणि मुलींना पाहून अभिजीतचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळणार आहे.
समोर आलेल्या नव्या बिग बॉस "सर्व सदस्य फ्रिज" म्हणतात. त्यानंतर अभिजीत सावंत गार्डन एरियामध्ये असताना घरात त्याच्या पत्नीची एन्ट्री होते. पत्नीला पाहून अभिजीतचे डोळे पाणावतात. पुढे त्याच्या दोन्ही मुली देखील घरात येऊन त्याला घट्ट मिठी मारतात.
advertisement
advertisement
अभिजीतच्या एका मुलीनं बिग बॉसना क्यूट रिक्वेस्ट केली. त्याची एक मुलगी म्हणते,"बिग बॉस मी इथे राहू शकते का?". चिमुकलीच्या प्रश्नाचं उत्तर देत 'बिग बॉस'पुढे म्हणतात,"चला एक वाइल्ड कार्ड मिळाला".
बिग बॉसच्या घरातील सगळेच सदस्य त्याँच्या फॅमिलीला भेटून भावूक होताना दिसणार आहे. प्रेक्षकही हा फॅमिली विक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2024 2:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
60 दिवसांनी बिग बॉसच्या घरात स्पेशल सदस्यांची एंट्री, अभिजीतचा 20 सेकंदाचा प्रोमो डोळ्यात पाणी आणेल