KBC 16ला मिळाला पहिला करोडपती! कोण आहे 22 वर्षांचा चंद्रप्रकाश?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
केबीसी 16चा पहिला करोडपती बनणारा चंद्रप्रकाश आहे तरी कोण? एक कोटी रुपये जिंकवून देणारा त्याचा प्रश्न तरी काय होता?
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'चा सोळावा सीझन सुरू आहे. या सिझनच्या पहिल्या करोडपतीची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर 'केबीसी 16' पहिला करोडपती मिळाला. 25 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये चंद्रप्रकाश हा करोडपती झाला. एक कोटींच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन त्याने 7 कोटींच्या प्रश्नाकडेही झेप घेतली. मात्र, उत्तर देण्याआधीच माघार घेतली. करोडपती बनणारा चंद्रप्रकाश आहे तरी कोण? एक कोटी रुपये जिंकवून देणारा त्याचा प्रश्न तरी काय होता?
'केबीसी 16'चा पहिला करोडपती चंद्रप्रकाश हा 22 वर्षांचा असून जम्मू-काश्मीर येथे राहणारा आहे. तो UPSC एस्पिरंट आहे. त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला आहे. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. चंद्रप्रकाश याला जन्मत: आतड्यांसंबंधित आजार आहेत. तसेच अनेक शारीरिक समस्यांनाही तो तोंड देत आहे. त्यावर आतापर्यंत 7 सर्जरी करण्यात आल्या आहेत. आजही तो आतड्यांसंबंधित आजाराचा सामना करतोय. डॉक्टरांनी त्याला आठवी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
काय होता 1 कोटीचा प्रश्न?
दकोणत्या देशाचे सर्वात मोठे शहर राजधानी नसून बंदर आहे? त्याच्या अरबी नावाचा अर्थ 'शांती निवास' असा आहे.
A. सोमालिया B. ओमान C. तंजानिया D. ब्रुनेई
या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चंद्रप्रकाश याने डबल डिप लाइफलाइन वापरली आणि 'तंजानिया' हे योग्य उत्तर दिले. या प्रश्नाचे उत्तर देत चंद्रप्रकाश करोडपती झाला.
advertisement
advertisement
त्यानंतर 7 कोटींसाठी प्रश्न असा होता की 1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांच्या घरात जन्मलेले पहिले मूल कोण होते, ज्याचे नाव नोंदवले गेले होते?
A. वर्जीनिया डेअर असं होतं. B. वर्जीनिया हॉल C. वर्जीनिया कॉफी D. वर्जीनिया सिंक
या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने चंद्रप्रकाश यांनी गेम सोडला. या प्रश्नाचे योग्य उत्तर A. वर्जीनिया डेअर असं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2024 1:46 PM IST