Beed News : वाल्मिक कराड जेलमध्ये अन् बाहेर जेलर कैद्याकडून करून घेतो 'अशी' काम, खळबळजनक VIDEO

Last Updated:

बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एक एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या प्रकरणामुळे हे कारागृह चर्चेत आलं होतं.

beed news
beed news
Beed News : सुरेश जाधव, बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एक एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या प्रकरणामुळे हे कारागृह चर्चेत आलं होतं.त्यानंतर काही दिवसांपूर्वी या विनापरवाना वृक्षतोड केल्याने कारागृह चर्चेत आलं होतं.त्यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबंधित व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.तसेच कैद्याकडून घरातील कामे,वाहन धुण्याची कामे असे अनेक वैयक्तित कामे करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड अडचणीत सापडले आहेत. तसेच या घटनेमुळे कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
advertisement

कारागृहात अनधिकृत वृक्षतोडी

कारागृहाच्या परिसरात 50 ते 60 वर्षांपूर्वीची मोठी वृक्ष कारागृह प्रशासनाने अचानक तोडून विकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री अजित दादा असलेल्या बीड जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असलेले ते वाढवण्यासाठी एकाच दिवशी 30 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम करण्यात आला.
एकीकडे प्रशासन वृक्ष लागवडीसाठी आग्रही असताना दुसरीकडे मात्र मध्यवर्ती कारागृहातच अनेक दशक उभी असलेली झाड तोडली आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
advertisement
विशेष वृक्ष तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी न घेता या वृक्षावर कुऱ्हाड चालवण्यात आली. तर जेल प्रशासनाला विचारण्यासाठी गेलेला सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना अरेरावीच्या भाषा करण्यात आली. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनधिकृत वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला आहे.
ऐन गणेश विसर्जनाच्या सुट्टीच्या दिवशी कारागृह परिसरातील महाकाय झाडे तोडण्यात आली यामुळे वृक्षप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बीड जिल्हा कारागृहाचे जेलर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.. संबंधित प्रकरणातील चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : वाल्मिक कराड जेलमध्ये अन् बाहेर जेलर कैद्याकडून करून घेतो 'अशी' काम, खळबळजनक VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement