Oops मोमेंटची शिकार झाली ऐश तरी...; रॅम्पवॉकवर ड्रेस फाटल्यानंतर अभिनेत्रीने काय केलं तुम्हीच पाहा, VIDEO

Last Updated:

ऐश्वर्या इज ऐश्वर्या. काही झालं तरी रॅम्प वॉकवर असताना ती कोणाचंही लक्ष स्वत:वरुन दुसरीकडे हलू देत नाही. मग स्टेजवर काहीही घडलं तरी चालेल.

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच पॅरिस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. पॅरिसमध्ये ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे चाहत्यांची मनं जिंकली.ऐश्वर्याबरोबर अभिनेत्री आलिया भट्ट देखील पॅरिस फॅशन विकमध्ये दिसली. ऐश्वर्याने तिच्या एलिगेंट लुकने सर्वांचं लक्ष वेधलं. ऐश्वर्या इज ऐश्वर्या. काही झालं तरी रॅम्प वॉकवर असताना ती कोणाचंही लक्ष स्वत:वरुन दुसरीकडे हलू देत नाही. मग स्टेजवर काहीही घडलं तरी चालेल.
पॅरिस फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक करताना ऐश्वर्याचा ड्रेस फाटला. तसाच ड्रेस परिधान करून ती स्टेजवर आली. पण चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स अजिबात ढळू न देता ऐश्वर्यानं रॅम्प वॉक पूर्ण केला.
advertisement
ऐश्वर्यानं पॅरिस फॅशन विकमध्ये रॅम्पवर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने रेड सॅटिन फिनिश बलून मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्याच्या ड्रेसला एक मोठी टेलही जोडलेली होती. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने रेड बोल्ड लिप्स आणि फ्रीझी ओपन हेअरस्टाईल केली होती.
advertisement
ऐश्वर्याच्या रेड ड्रेसचं सर्वत्र कौतुक होत आहे. ऐश्वर्याच्या या रेड बलून ड्रेसला 7 मीटरची लांब ट्रेल अटॅच करण्यात आली होती. त्याच्यावर एका ब्रँडची टॅगलाइन लिहिण्यात आली होती. ती ट्रेल पकडून ऐश्वर्याबरोबर लोक स्टेजवर आले होते. ऐश्वर्यानं रॅम्प वॉक सुरू केला आणि तिच्या ड्रेसला अटॅच लाँग ट्रेल फाटली आणि स्टेजवरच पडली.
advertisement
advertisement
advertisement
ड्रेसचा एक महत्त्वाचा भाग खाली पडल्याचं कळल्यानंतरही ऐश्वर्याचा कॉन्फिडन्स अजिबात हलला नाही. तिने काही झालंच नाही असं दाखवत कॉन्फिडन्समध्ये वॉक सुरू ठेवला. त्यानंतर ती मागे वळली आणि तिने ती ट्रेल उचलली आणि गाऊनला पुन्हा अटॅच केली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Oops मोमेंटची शिकार झाली ऐश तरी...; रॅम्पवॉकवर ड्रेस फाटल्यानंतर अभिनेत्रीने काय केलं तुम्हीच पाहा, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement