Health : तुम्हीही चवीने खाताय पिझ्झा अन् वाढतंय वजन? हेल्थ एक्स्पर्टने थेट सांगितलं खरं कारण
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
पिझ्झा हा जगभरातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. पण, भारतात पिझ्झाला अनेकदा वजन वाढवणारे आणि आरोग्यसाठी हानिकारक मानले जाते, तर इटलीमध्ये लोक तो रोज खातात आणि तरीही फिट राहतात.
Pizza And Weight Gain Connection : पिझ्झा हा जगभरातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. पण, भारतात पिझ्झाला अनेकदा वजन वाढवणारे आणि आरोग्यसाठी हानिकारक मानले जाते, तर इटलीमध्ये लोक तो रोज खातात आणि तरीही फिट राहतात. यामागचे कारण पिझ्झा बनवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतीत दडलेले आहे. भारतीय पिझ्झा आणि इटालियन पिझ्झामध्ये मोठा फरक आहे. हेल्थ कोच डिंपल जांगडा, यांनी इटालियन आणि भारतीय पिझ्झा यांच्यातील फरक सांगितला आहे.
इटालियन आणि भारतीय पिझ्झामधील मोठे फरक
पातळ आणि हलका बेस
इटालियन पिझ्झाचा बेस खूप पातळ असतो. तो मैदा वापरून बनवला जात नाही, तर गव्हाचे पीठ वापरले जाते, जे पचायला सोपे आहे. भारतीय पिझ्झाचा बेस जाड आणि ब्रेडसारखा असतो, जो पचायला जड असतो.
ताज्या साहित्याचा वापर
इटलीमध्ये पिझ्झा बनवण्यासाठी ताजे आणि नैसर्गिक साहित्य वापरले जाते. ताजे टोमॅटो, फ्रेश मोझरेला चीज आणि पार्सलीची पाने ही त्याची मुख्य सामग्री आहेत. यात प्रक्रिया केलेले पदार्थ खूप कमी असतात.
advertisement
टॉपिंग्जमध्ये साधेपणा
इटालियन पिझ्झावर टॉपिंग्ज खूप कमी आणि साधी असतात. फक्त काही भाज्या, थोडे ऑलिव्ह ऑइल आणि चीज घातले जाते. भारतीय पिझ्झावर जास्त चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्या, पनीर, किंवा चिकनचा वापर केला जातो, ज्यामुळे तो अधिक कॅलरी आणि चरबीयुक्त बनतो.
प्रमाण आणि जीवनशैली
इटलीमध्ये पिझ्झाला पूर्ण जेवण मानले जाते आणि एका वेळी एकच पिझ्झा खाल्ला जातो. यासोबतच त्यांची जीवनशैली खूप सक्रिय असते, ज्यामुळे खाल्लेल्या कॅलरी जळून जातात. भारतात पिझ्झा अनेकदा फास्ट फूड म्हणून खाल्ला जातो आणि शारीरिक हालचाल कमी असते.
advertisement
चयापचय क्रिया
इटालियन पिझ्झातील ताजे घटक आणि कमी तेल यामुळे तो पचायला सोपा असतो, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया चांगली राहते. भारतीय पिझ्झामधील जास्त चीज आणि तेल पचनक्रिया मंदावते.
स्वादावर लक्ष
इटालियन लोक पिझ्झाचा नैसर्गिक स्वाद अनुभवतात. त्यात फक्त 3-4 प्रकारचेच घटक असतात. भारतीय पिझ्झाचा स्वाद जास्त मसालेदार आणि तिखट असतो, जो नैसर्गिक घटकांचा स्वाद झाकून टाकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health : तुम्हीही चवीने खाताय पिझ्झा अन् वाढतंय वजन? हेल्थ एक्स्पर्टने थेट सांगितलं खरं कारण