Bollywood Actress : वडील पाकिस्तानी, बॉलिवूडची मुस्लिम अभिनेत्री करते हनुमान चालीसा पठण; आहे कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे वडील पाकिस्तानी आहेत. अभिनेत्री मुस्लिम असूनही हनुमान चालीसा पठण आवडीने करते. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतही काम केलं आहे.
Bollywood Actress : एका कलाकाराला आपल्या करिअरच्या सुरुवातीला विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय द्यावा लागतो. सर्वकाही विसरून आपल्या करत असलेल्या भूमिकेचा अभ्यास करावा लागतो. पण तरीही अनेकदा सिने तारतारकांना धर्मावरुन ट्रोल करण्यात येते. एखादी हिंदू अभिनेत्री मुस्लिम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली की लगेचच वादाची ठिणगी पडते. दुसरीकडे याच हिंदू अभिनेत्रीने मुस्लिम अभिनेत्यासोबत संसार थाटला तर मग काय विचारायलाच नको. पण आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल भाष्य करतोय या अभिनेत्रीने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. या अभिनेत्रीने अमेरिकेत मॉडेलिंगचं कामही केलं आहे. पण आता बॉलिवूडमध्ये धमाका करताना ही अभिनेत्री दिसून येते.
45 वर्षीय 'ही' अभिनेत्री नुकतीच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारसोबत झळकली होती. तसेच भाईजान सलमान खानच्या 'Kick' चित्रपटातही काम केलं आहे. स्वत:ला ही अभिनेत्री ग्लोबल सिटीजन समजते. यामागचं कारण तिचे आई-वडील आहेत. या अभिनेत्रीचे आई-वडील वेगवेगळ्या देशांतले आहेत. अभिनेत्री रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' या चित्रपटातून या अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. आपल्या अभिनयाने या अभिनेत्रीने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
advertisement
कोण आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री?
नरगिस फाखरी (Nargis Fakhri) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. अभिनेत्रीची आई Czech ची असून वडील पाकिस्तानचे आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीच्या वडीलांचं निधन झालंय. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सलग सिनेसृष्टी गाजवताना दिसून येते. आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत तिने 16 चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री शेवटची 'हाऊसफुल 5' या चित्रपटात झळकली. तसेच अनेक म्युझिक अल्बमध्येही तिने काम केलं आहे. आपल्या सादरीकरणासाठी तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
advertisement
नरगिस फाखरीने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं की,"तिला गायत्री मंत्र ऐकायला आवडतं. गायत्री मंत्र ऐकल्यानंतर अभिनेत्रीला शांतता मिळते. तसेच अभिनेत्री धार्मिक नसली तरी आध्यात्मिक आहे. तणावात असताना अभिनेत्री हनुमान चालीसा पठण करते. अभिनेत्रीला सर्व धर्मांबद्दल जाणून घ्यायला आवडतं".
'या' अभिनेत्यासोबत नरगिस रिलेशनमध्ये होती...
नरगिस फाखरीचं नाव धूम फेम अभिनेता उदय चोपडासोबत जोडलं गेलं होतं. 2013 ते 2017 पर्यंत अभिनेत्री उदय चोपडासोबत रिलेशनमध्ये होती. लग्नापर्यंत त्यांचं रिलेशन गेलं होतं. पण कामाच्या व्यापामुळे एकमेकांना वेळ देणं जमलं नाही आणि त्यांचं रिलेशन तुटलं. अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये अभिनेत्री लॉस एंजिल्स येथील टोनी बेगसोबत लग्नबंधनात अडकली. जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत अभिनेत्रीचं लग्न झालं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Actress : वडील पाकिस्तानी, बॉलिवूडची मुस्लिम अभिनेत्री करते हनुमान चालीसा पठण; आहे कोण?