Pune Crime : 'मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेव', निवृत्त ACP चा सुनेला अश्लील सल्ला! हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले अन्...

Last Updated:

Pune Crime News : आई-वडिलांची फसवणूक करून तिचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर तिचा पती गौरव तांबे हा मूल होण्यास असमर्थ (नपुंसक) असल्याचे तिला समजलं, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

 retired ACP lewd advice to daughter in law
retired ACP lewd advice to daughter in law
Pune Crime News :  पुण्याला सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जयसिंग तांबे यांच्यावर आपल्या सुनेचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री त्यांनी सुनेच्या बेडरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पती गौरव जयसिंग तांबे आणि सासू श्रद्धा जयसिंग तांबे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक करून लग्न लावलं

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आई-वडिलांची फसवणूक करून तिचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर तिचा पती गौरव तांबे हा मूल होण्यास असमर्थ (नपुंसक) असल्याचे तिला समजलं. यानंतर सासरा, पती आणि सासू यांनी 'वारसदार' मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. 30 वर्षांच्या पीडित महिलेचं मागच्याच महिन्यात 35 वर्षांच्या मुलासोबत लग्न झालं होतं. मात्र, मुलगा नपुंसक निघाल्याचं पिडीतेने म्हटलं आहे.
advertisement

तुला मूल हवं असेल तर...

पिडिताने केलेल्या तक्रारीनुसार, पती गौरव आणि सासू श्रद्धा यांनी पीडितेला 'तुला मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेव' असा दबाव आणला. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सासरा जयसिंग तांबे यांनी तिच्या बेडरूममध्ये घुसून शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यावर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणी नवऱ्यासोबत महाबळेश्वरला हनिमूनला गेली होती. त्यावेळी पतीचा खरा चेहरा समोर आला. हनिमूनवरून आल्यानंतरच सासऱ्याने रंग दाखवले.
advertisement

सुनेकडे शरीर सुखाची मागणी

सासऱ्याने अनेकदा सुनेला धमकी देखील दिली होती. सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली. नकार दिला तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकीही सासऱ्याने दिल्याचा आरोप सुनेने केला आहे. 5 जून ते 23 जून 2025 च्या दरम्यान वारंवार असे प्रकार सुनेसोबत घडत होते, असं देखील तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement

सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, तक्रारीनंतर सहकारनगर पोलिसांनी जयसिंग तांबे, त्यांचा मुलगा गौरव आणि पत्नी श्रद्धा यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेव', निवृत्त ACP चा सुनेला अश्लील सल्ला! हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले अन्...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement