Pune News: पाय-हात अन् पाठीवर चावा! पुण्यातील सिंहगड परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुलांवर हल्ला
- Published by:Kranti Kanetkar
 
Last Updated:
पुण्यात सिंहगड परिसरातील नारायण नगर आणि गोसावी नगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांवर हल्ला केला, नागरिकांमध्ये भीती, महापालिकेकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी.
पुणे, प्रतिनिधी अभिजित पोते: दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चर्चेत असताना महाराष्ट्रात मात्र भटक्या कुत्र्यांकडून सतत लोकांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातही भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. पुण्यातील सिंहगड परिसरात भटक्या कुत्र्यांनी मुलांवर जीवघेणा हल्ला केला. या मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्यातून सोडवलं असून त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढत असून, आता सिंहगड परिसरात तीन मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समोर आलं. नारायण नगर आणि गोसावी नगर या भागांत ही घटना घडली असून, जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पुणे महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरातील नारायण नगर आणि गोसावी नगरात खेळत असलेल्या लहान मुलांना मोकाट कुत्र्याने अचानक चावा घेतला. या हल्ल्यात मुले जखमी झाली आहेत. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करून रेबीजची लस देण्यात आली आहे. हाताला, पायाला आणि पाठीवर कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
गेल्या काही काळापासून पुण्यातील अनेक भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे कुत्रे अनेकदा लहान मुलांना आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर हल्ले करत असतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 12, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पाय-हात अन् पाठीवर चावा! पुण्यातील सिंहगड परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुलांवर हल्ला


