Garuda Purana: पुढच्या जन्मात जनावर बनतात! गरुड पुराणानुसार आयुष्यात कधीच करू नयेत अशा 5 गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Garuda Purana: मानवी योनी (मानवी जन्म) अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानली जाते, ती केवळ चांगल्या कर्मांनीच पुढे कायम राखता येते. परंतु, मनुष्य ज्ञानी असूनही आपल्या जीवनात चुका करतो, त्याची कर्मे त्याला पुढील जन्मात भोगावी लागू शकतात.
मुंबई : हिंदू धर्मात गरुड पुराणाला महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ मानले जाते. मनुष्याचे कर्म त्याचा पुढील जन्म आणि योनी निश्चित करतात, याविषयीची तपशीलवार माहिती त्यामध्ये आहे. व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे परिणाम निश्चित असतात, असं गरुड पुराण सागतं. मानवी योनी (मानवी जन्म) अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानली जाते, ती केवळ चांगल्या कर्मांनीच पुढे कायम राखता येते. परंतु, मनुष्य ज्ञानी असूनही आपल्या जीवनात चुका करतो, त्याची कर्मे त्याला पुढील जन्मात भोगावी लागू शकतात. चुकीची कर्मे त्याला पशु योनी किंवा अधोगतीकडे घेऊन जातात. गरुड पुराणानुसार, काही कर्मे इतकी निंदनीय मानली आहेत की ती केल्यावर आत्मा निश्चितच नीच योनीत जन्म घेतो. गरुड पुराणात सांगितलेली पाच कर्मे जाणून घेऊया, ती चुकूनही करू नयेत.
मित्राची फसवणूक - गरुड पुराणानुसार, जो माणूस आपल्या खऱ्या मित्राचा विश्वासघात करतो किंवा फसवतो त्याला त्याचा पुढचा जन्म गिधाडाच्या रूपात मिळतो. गिधाडाची योनी म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणे, जी विश्वासघात आणि नीच कर्मांची शिक्षा आहे.
धर्म आणि देवाचा अपमान करणे - गरुड पुराणात ठळकपणे नमूद केले आहे की, जे लोक धर्म, वेद, पुराणे किंवा देवाचा अनादर करतात त्यांना पुढील जन्मात कुत्र्याची योनी मिळते. या प्राण्याच्या योनीत अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते.
advertisement
धूर्तपणा आणि इतरांना फसवणे - गरुड पुराणानुसार, जो माणूस आपल्या हुशारीने इतरांना फसवतो तो पुढच्या जन्मात घुबड म्हणून जन्माला येतो. ही योनी अंधार, अशुभता आणि अज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने चुकूनही हे काम करू नये.
अपशब्दांचा वापर - गरुड पुराणानुसार, कोणत्याही व्यक्तीने आपल्या शब्दांनी इतरांना दुखवू नये, अपशब्द वापरू नये. जे लोक इतरांना शिवीगाळ करतात किंवा त्यांचा अपमान करतात ते पुढच्या जन्मात बकरी म्हणून जन्माला येतात.
advertisement
महिलांवर वाईट नजर ठेवणे - गरुड पुराणानुसार, जे पुरुष महिलांचा अपमान करतात किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहतात, त्यांना पुढील जन्म साप किंवा सरड्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात मिळतो. लैंगिक वासनेत बुडून जाण्याची आणि अधोगतीची ही शिक्षा आहे. म्हणून या पापी कृत्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 1:40 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Garuda Purana: पुढच्या जन्मात जनावर बनतात! गरुड पुराणानुसार आयुष्यात कधीच करू नयेत अशा 5 गोष्टी