Ertiga आता विसरा, Toyota Innova झाली तब्बल 180600 रुपयांनी स्वस्त, Hycross ची किंमत तर...
- Published by:Sachin S
Last Updated:
Toyota innova म्हटलं तर मजबूत आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते. आता जीएसटीच्या दरात बदल करण्यात आल्यामुळे Toyota ने innova आणि innova crysta च्या किंमतीत किती फरक पडला आहे
केंद्र सरकारने GST च्या कर रचनेत बदल केला आहे. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठा परिणाम दिसून येत आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतीत कपात केल्याची घोषणा केली आहे. मागील अनेक दशकांपासून लोकांचा विश्वास जिंकणाऱ्या Toyota नेही आपल्या innova च्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लांबपल्याच्या प्रवासासाठी फेमस असलेल्या इनोव्हाच्या किंमतीत तब्बल 1,80,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Toyota ची innova ही आरामदायक अशी 7 आणि 8 सीटर एमपीव्ही ओळखली जाते. इनोव्हामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, रिअर एसी वेंट्स, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हिल आणि क्रूज कंट्रोल सारखे हायटेक फिचर्स दिलेले आहे. सुरक्षेसाठी मल्टीपल एअरबॅग्स, ABS, EBD, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि हील स्टार्ट असिस्ट सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
advertisement