Toyota: लांब प्रवासाची 'क्विन' Innova Crysta होणार बंद, टोयोटा आता थांबवणार प्रोडक्शन, हे आहे कारण
- Published by:Sachin S
Last Updated:
आरामदायक आणि मजबूत अशा कारचा मान हा टोयोटा कंपनीला मिळतो. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर हमखास टोयोटाच्या इनोव्हाचं नाव सर्वात आधी समोर येतं. पण, आता टोयाटोने इनोव्हा क्रिस्टाला (innova crysta) निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.
आरामदायक आणि मजबूत अशा कारचा मान हा टोयोटा कंपनीला मिळतो. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर हमखास टोयोटाच्या इनोव्हाचं नाव सर्वात आधी समोर येतं. टोयोटाच्या इनोव्हाने मागील अनेक दशकांपासून भारतीय मध्यमवर्गीय आणि ट्रॅव्हल्स बिझनेसमध्ये इनोव्हा ही एक आयकॉनिक ७ सीटर एमपीव्ही ठरली आहे. पण, आता टोयाटोने इनोव्हा क्रिस्टाला (innova crysta) निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७ मध्ये इनोव्हाचं उत्पादन थांबवण्यात येणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण इनोव्हा हाईक्रॉस सध्या मार्केटमध्ये आहे, पण असं वाटतं की इनोव्हा क्रिस्टा गेल्यावर जे रिकामेपण येईल, ते पूर्णपणे भरून काढू शकणार नाही. टोयोटाने 2025 मध्ये इनोव्हा क्रिस्टाचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इनोव्हा हाईक्रॉस लाँच करताना घेतला होता. पण हाईक्रॉस लाँच झाल्यावर टोयोटाला सेमीकंडक्टरची कमतरता वगैरे अनेक अडचणी आल्या. जेव्हा कंपनीने पाहिलं की, इनोव्हा हाईक्रॉसची वेटिंग लिस्ट मोठी आहे आणि इनोव्हा क्रिस्टा किंवा डिझेल एमपीव्हीची मागणी अजूनही आहे, तेव्हा टोयोटाने क्रिस्टा पुन्हा मार्केटमध्ये आणली.
advertisement
इनोव्हा क्रिस्टा पुन्हा लाँच होईल का, असं विचारलं जात आहे, पण जुन्या व्हर्जनच्या तुलनेत पुन्हा लाँच केलेली क्रिस्टा फक्त डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह आली होती. यात 2.4-लिटर टर्बो-डिझेल इंजिन दिलं होतं, जे सध्याच्या एमिशन नॉर्म्सनुसार होतं. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मुद्दाम दिलं नव्हतं, कारण कंपनीला माहीत होतं की , यामुळे इनोव्हा हाईक्रॉसच्या विक्रीवर परिणाम होईल. एकूणच, टोयोटाकडे इनोव्हा क्रिस्टाचा योग्य पर्याय नाही आणि आता पाहावं लागेल की महिंद्रा, टाटा किंवा हुंदईसारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नवी एमपीव्ही आणतात का, जेणेकरून ग्राहकांची गरज पूर्ण होईल.








