'मुलाला मारलंय, बॉडी घेऊन जा...', हत्या करून हल्लेखोर घरी आले, कबड्डीपटूचा 'कोल्ड ब्लडेड' मर्डर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्लेखोर कबड्डीपटूची फक्त हत्या करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी खेळाडूच्या घरी जाऊन, 'त्याचा मृतदेह घेऊन जा', असं कुटुंबाला सांगितलं.
कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्लेखोर कबड्डीपटूची फक्त हत्या करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी खेळाडूच्या घरी जाऊन, 'त्याचा मृतदेह घेऊन जा', असं कुटुंबाला सांगितलं. पंजाबच्या लुधियानामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये झालेली ही तिसरी हत्या आहे.
गगनदीप सिंग उर्फ गगनाची सोमवारी मनुके गावात हत्या करण्यात आली. गगन त्याच्या मित्रासोबत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी माजी कबड्डी स्टारवर गोळीबार केला आणि त्याचा मृतदेह जवळच्या शेतात फेकून दिला.
लुधियाना ग्रामीणचे एसएसपी अंकुर गुप्ता यांच्या मते, गगनदीपला किमान तीन गोळ्या लागल्या आहेत. कुटुंबाने नाव दिलेल्या पाच आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
advertisement
'आमच्या कुटुंबातील काही सदस्य रस्त्यावर उभे असताना हल्लेखोर आले आणि ओरडले - 'तुहडा बंदा मार ता, चक लो जाके' (आम्ही तुमच्या मुलाला मारले आहे, जा आणि त्याचा मृतदेह घेऊन जा). हे अराजकतेशिवाय दुसरे काहीही नाही,' अशी प्रतिक्रिया गगनचे वडील गुरदीप सिंग बग्गा यांनी दिली आहे.
गुरदीप सिंग बग्गा (वय 60) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे गगनच्या मित्रासोबत वैर होते. 'माझा मुलगा एकम आणि हल्लेखोरांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता पण त्यांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. माजी कबड्डी खेळाडू असलेला गगन भाताच्या दुकानात मजूर म्हणून काम करत होता.
advertisement
गगन पत्नी नवप्रीत कौर म्हणाली की 'गगनदीप आणि एकम एकत्र कबड्डी खेळत होते, पण हल्लेखोर त्याला विरोध करत होते. 31 डिसेंबर रोजी आरोपींनी एकमवर तलवारीने हल्ला केला होता. आज त्यांनी आणखी लोकांना बोलावून माझ्या पतीला गोळ्या घालून ठार मारले'.
लुधियाना रेंजचे डीआयजी सतिंदर सिंग यांनी या घटनेला 'गावपातळीवरील वैर' म्हटले आणि कबड्डीशी संबंधित कोणताही मुद्दा आतापर्यंत समोर आलेला नाही याची पुष्टी केली.
advertisement
'मुख्य आरोपीची ओळख पटली आहे, त्याचं नाव गुरसेवक सिंग उर्फ मोटू आहे. सकाळी गावपातळीवरील वैमनस्यातून दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला किरकोळ हाणामारी झाली. दुपारनंतर गुरसेवक सिंग उर्फ मोटू अनेक साथीदारांसह परतला आणि त्याने गोळीबार केला. गगनदीप आणि गुरसेवक दोघेही एकाच गावातील आहेत. कुटुंबाने नावं सांगितलेल्या आरोपींपैकी एकाला आम्ही आधीच अटक केली आहे आणि उर्वरितांना लवकरच अटक केली जाईल. प्रथमदर्शनी असे दिसून येते की, गगनला तीन गोळ्या लागल्या आहेत,' असे डीआयजी म्हणाले.
advertisement
आम आदमी पक्षाचे (आप) जागरावचे आमदार सर्वजीत कौर मानुके हे मानुके गावचे रहिवासी आहे. गगनदीप गावातील वंचित तरुणांना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा, असं सर्वजीत कौर यांनी सांगितलं.
'आरोपी एकमला लक्ष्य करत होते पण गगनदीप त्याच्या बाजूने उभा राहिला ज्यामुळे त्यांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. गगनदीपला तीन मुले आहेत. त्यांचा काय दोष होता? परिस्थिती खूप वाईट आहे. आमचे पंजाबी तरुण दिशाहीन झाले आहेत. अशा गुंडगिरीतून मृतदेहांशिवाय काहीही बाहेर येत नाही. एका कुटुंबाने आपला कमावता मुलगा गमावला आहे. अशी गुंडगिरी आता सहन केली जाणार नाही, असं मी एसएसपींना सांगितलं आहे', अशी प्रतिक्रिया आप आमदाराने दिली आहे.
view commentsLocation :
Ludhiana,Punjab
First Published :
Jan 06, 2026 11:15 PM IST
मराठी बातम्या/देश/
'मुलाला मारलंय, बॉडी घेऊन जा...', हत्या करून हल्लेखोर घरी आले, कबड्डीपटूचा 'कोल्ड ब्लडेड' मर्डर!











