शेअर बाजारात असं कधीच झालं नाही, प्रत्येकाला मिळणार फुटक 23 शेअर्स; व्यवहार न होणाऱ्या कंपनीच्या निर्णयाने खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: मॅग्नेनिमस ट्रेड अँड फायनान्सने बोनस शेअर्स जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात उत्सुकता आणि सस्पेन्स वाढला आहे. सध्या व्यवहार नसलेल्या या शेअरमध्ये पुढे हालचाल होते का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: मॅग्नेनिमस ट्रेड अँड फायनान्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 5 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत बोनस शेअर्स जारी करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार कंपनी एकूण 2 कोटी 18 लाख 83 हजार 764 पूर्णपणे भरलेले (fully paid-up) बोनस इक्विटी शेअर्स जारी करणार आहे.
advertisement
कंपनीने बोनस शेअर्सचा अनुपात 23:1 असा निश्चित केला आहे. म्हणजेच 2 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड डेट मानून, त्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा 1 शेअर होता, त्यांना त्याबदल्यात 23 नवे बोनस शेअर्स मिळणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील बोनस इश्यूमुळे कंपनीचे नाव पुन्हा एकदा शेअर बाजारात चर्चेत आले आहे.
advertisement
शेअरची सध्याची स्थिती काय?
बीएसईकडे उपलब्ध माहितीनुसार, मॅग्नेनिमस ट्रेड अँड फायनान्सच्या शेअर्समध्ये शेवटचा व्यवहार 9 ऑगस्ट 2024 रोजी झाला होता. त्या वेळी शेअरची किंमत 5.64 रुपये होती. सध्या मात्र या शेअरमध्ये कोणताही नियमित व्यवहार होत नाही. त्यामुळे बोनस इश्यूच्या घोषणेनंतर भविष्यात या शेअरमध्ये हालचाल होते का, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
advertisement
कंपनीने नेमके काय स्पष्ट केले?
कंपनीने सांगितले आहे की हे सर्व बोनस शेअर्स 10 रुपये फेस व्हॅल्यूचे असतील आणि विद्यमान भागधारकांना कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता दिले जातील. रेकॉर्ड डेटला ज्यांची नावे कंपनीच्या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये असतील, तेच गुंतवणूकदार या बोनस शेअर्ससाठी पात्र ठरणार आहेत.
advertisement
या निर्णयामुळे लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी हा बोनस इश्यू विशेष महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे त्यांच्या हातातील शेअर्सची संख्या थेट अनेक पटींनी वाढणार आहे.
बोनस शेअर्स वाटपानंतर कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता मॅग्नेनिमस ट्रेड अँड फायनान्सची एकूण पेड-अप शेअर कॅपिटल 2 कोटी 28 लाख 35 हजार 232 इक्विटी शेअर्स इतकी झाली आहे. सर्व शेअर्सचा फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे.
advertisement
बोनस शेअर म्हणजे नेमके काय?
बोनस शेअर्स म्हणजे कंपनी आपल्या विद्यमान भागधारकांना मोफत देत असलेले शेअर्स. हे शेअर्स कंपनी आपल्या नफ्यातून किंवा साठवलेल्या रिझर्व्हमधून जारी करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीने 1:1 बोनस जाहीर केला आणि तुमच्याकडे 10 शेअर्स असतील, तर तुम्हाला आणखी 10 शेअर्स मिळतात आणि एकूण संख्या 20 होते.
advertisement
बोनस शेअर्समुळे गुंतवणुकीची एकूण किंमत लगेच दुप्पट होत नाही, मात्र शेअर्सची संख्या वाढते. यामुळे शेअरची लिक्विडिटी वाढते, गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होतो आणि कंपनी आपल्या भागधारकांना एक प्रकारे बक्षीस देते. साधारणपणे कंपन्या चांगला नफा आणि मजबूत आर्थिक स्थिती असताना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 10:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारात असं कधीच झालं नाही, प्रत्येकाला मिळणार फुटक 23 शेअर्स; व्यवहार न होणाऱ्या कंपनीच्या निर्णयाने खळबळ











