Health Tips : दूध - मधाचं मिश्रण करेल जादू, शरीराला पोषण देणारं सुवर्ण अमृत, वाचा सविस्तर

Last Updated:

दूध आणि मध दोन्हीचे गुणधर्म शरीरासाठी गुणकारी आहेतच. हे दोन्ही एकत्र मिसळले जातात तेव्हा हे मिश्रण शरीराला संपूर्ण पोषण देणारं सुवर्ण अमृत म्हटलं जातं. आयुर्वेदापासून ते आधुनिक संशोधनापर्यंत, दूध आणि मधाचं हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती, ऊर्जा आणि मानसिक शांतीचा स्रोत मानलं गेलं आहे.

News18
News18
मुंबई : तुम्हाला दूध प्यायला आवडत असेल आणि मधही....तर ही माहिती नक्की वाचा, कारण तुम्हाला आवडणाऱ्या या दोन्ही गोष्टी शरीरासाठी सर्वोत्तम आहेत. हे मिश्रण शरीराच्या तंदुरुस्तीसाठी उत्तम आहे.  आरोग्यासाठीचा खजिना आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला असतो असं म्हणतात आणि दूध आणि मध हे याचं उत्तम उदाहरण आहेत.
दूध आणि मध दोन्हीचे गुणधर्म शरीरासाठी गुणकारी आहेतच. हे दोन्ही एकत्र मिसळले जातात तेव्हा हे मिश्रण शरीराला संपूर्ण पोषण देणारं सुवर्ण अमृत म्हटलं जातं. आयुर्वेदापासून ते आधुनिक संशोधनापर्यंत, दूध आणि मधाचं हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती, ऊर्जा आणि मानसिक शांतीचा स्रोत मानलं गेलं आहे.
advertisement
दुधातलं कॅल्शियम, प्रथिनं आणि जीवनसत्त्वं आणि मधातील अँटिऑक्सिडंट्ससोबत एकत्र येतात तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट होते.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून प्यायलानं ताण कमी होतो आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. निद्रानाशाचा त्रास असेल तर दूध आणि मधाचा हा घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतो. झोपेच्या एक तास आधी दुधात मध घालून प्यायल्यानं झोप गाढ आणि शांत लागते. बद्धकोष्ठता तसंच पचनाच्या समस्या देखील कमी होतात कारण यामुळे आतडी निरोगी राहतात.
advertisement
दूध आणि मधाचं नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत होतात आणि संधिवातासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. तसंच यामुळे, मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते आणि यामुळे थकवा दूर होतो. शरीरात ऊर्जा जाणवते. दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहण्यासाठी हा कॉम्बो परिणामकारक आहे.
advertisement
पुरुषांसाठी विशेष उपयुक्त - दूध आणि मधाचं मिश्रण पुरुषांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण वाढतं. यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असंही संशोधनातून समोर आलंय.
मध आणि दुधानं दृष्टी सुधारण्यास मदत होते. खोकला, दमा आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांतूनही आराम मिळतो. दूध आणि मध हे एकत्र मिश्रण, हे एका पॉवरपॅक्ड न्यूट्रिशन ड्रिंकपेक्षा कमी नाही. हे केवळ शारीरिक कमजोरी दूर करत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील सुधारते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : दूध - मधाचं मिश्रण करेल जादू, शरीराला पोषण देणारं सुवर्ण अमृत, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement