Scrub : घरी तयार करा फेशल स्क्रब, चेहरा दिसेल स्वच्छ आणि उजळ, या पर्यायांचा करा वापर

Last Updated:

चेहरा स्वच्छ, फ्रेश दिसावा यासाठी घरीही चांगले स्क्रब बनवता येतात. बाजारातून महागडे स्क्रब खरेदी करण्याऐवजी, हे स्क्रब वापरुन बघा. यासाठी ओटमील, मुलतानी माती, कोरफड, कॉफी, नारळाचं तेल यापासून वेगवेगळे स्क्रब तयार करता येतात.

News18
News18
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, मृत त्वचा निघून जाण्यासाठी स्क्रबचा वापर सर्रास केला जातो. स्क्रबमुळे चेहऱ्यावरचं जास्तीचं तेल, मृत त्वचेच्या पेशी यामुळे काढून टाकल्या जातात आणि त्वचा पूर्वीपेक्षा उजळ आणि तजेलदार दिसते.
चेहरा स्वच्छ, फ्रेश दिसावा यासाठी घरीही चांगले स्क्रब बनवता येतात. बाजारातून महागडे स्क्रब खरेदी करण्याऐवजी, हे स्क्रब वापरुन बघा. यासाठी ओटमील, मुलतानी माती, कोरफड, कॉफी, नारळाचं तेल यापासून वेगवेगळे स्क्रब तयार करता येतात.
ओटमील स्क्रब - हा स्क्रब बनवण्यासाठी ओटमील, ऑलिव्ह ऑइल, दूध आणि गुलाबजल हे साहित्य आवश्यक आहे. दोन चमचे भिजवलेल्या ओट्समध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा दूध आणि काही थेंब गुलाबजल घाला. हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि घासून घ्या आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळते आणि त्वचेचा पोत सुधारतो.
advertisement
मुलतानी माती आणि कोरफड - मुलतानी माती आणि कोरफडापासून स्क्रब बनवता येतो आणि चेहऱ्यावर लावता येतो. हा स्क्रब बनवण्यासाठी, एक चमचा मुलतानी मातीत आवश्यकतेनुसार कोरफड जेल घाला आणि ते चेहऱ्यावर लावून घासून घ्या. एक-दोन मिनिटं घासल्यानंतर, चेहरा धुवून स्वच्छ करा.
advertisement
कॉफी आणि नारळ तेल स्क्रब - कॉफी आणि मधाच्या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात. या स्क्रबमुळे मुरुमं कमी होतात आणि त्वचेचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण होतं. हा स्क्रब बनवण्यासाठी, दोन चमचे कॉफीत एक चमचा साखर आणि थोडंसं खोबरेल तेल मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर लावून घासा आणि नंतर चेहरा धुवा.
advertisement
साखर आणि मधाचे स्क्रब - त्वचेच्या आरोग्यासाठीही या स्क्रबचा चांगला परिणाम होतो. स्क्रब बनवण्यासाठी, मध आणि साखर मिसळा. स्क्रब बनवण्यासाठी बारीक दाणेदार साखर वापरा. ​​हे स्क्रब बोटांवर लावा आणि चेहऱ्यावर घासून घ्या आणि नंतर ते धुवा. या सगळ्या नैसर्गिक पर्यायांमुळे चेहरा फ्रेश दिसेल पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर हा स्क्रब लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरु नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Scrub : घरी तयार करा फेशल स्क्रब, चेहरा दिसेल स्वच्छ आणि उजळ, या पर्यायांचा करा वापर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement