advertisement

VIDEO : धोनीच नाव आणि ती कमेंट,गंभीरचा चेहरा बघण्यासारखा होता, कधी नव्हे तो असा हसला

Last Updated:

गौतम गंभीरने धोनीच्या कमेंटवर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. या दरम्यान त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

gautam gambhir reaction on ms dhoni
gautam gambhir reaction on ms dhoni
Gautam Gambhir Reaction on Ms Dhoni Comment : टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 वर नाव कोरल्याने सगळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या आनंद द्विगुणीत त्यावेळेस झाला ज्यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सोशल मीडियावर पोस्ट करून टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरचे कौतुक केले होते. या कौतुकानंतर गौतम गंभीरने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडी सोशल मीडीयावर घडल्या होत्या. पण आता गौतम गंभीरने धोनीच्या कमेंटवर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. या दरम्यान त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वर्ल्डकपच्या फायनल सामन्याला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखील मैदानात उपस्थित होता. धोनीने भारताच्या या विजयानंतर इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीच कौतुक करताना एम एस धोनीने गौतम गंभीरच कौतुक केलं होतं. कोच साहब तुमच्या चेहऱ्यावर हास्य खुप छान दिसतं आहे. गंभीरची मैदानातील जिंकण्याची इच्छाशक्ती आणि हे हास्य म्हणजे एक 'किलर कॉम्बो' असल्याचं धोनीने मिश्किलपणे म्हटलं आहे.त्यामुळे धोनीच्या या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
advertisement
धोनीच्या याच स्टोरीवर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर देखील रिअॅक्ट झाला होता. हसण्यामागचे हे कारण आहे, आणि तुला पाहून छान वाटलं,असे गौतम गंभीर धोनीच्या कमेंटवर म्हणाला होता.
advertisement
एएनआयच्या मुलाखतीत धोनीच्या कमेंटचा प्रश्न गौतम गंभीरला विचारण्यात आला होता. तेव्हा गंभीरच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य होतं आणि त्याचा चेहरा खुलला होता. खरं सांगायचं झाल तर चांगली गोष्ट आहे त्याने (धोनीने) पोस्ट केली होती. एक कोच म्हणून काही गोष्टी खूप कठीण जातात. पण जेव्हा तुम्ही डगआऊटमध्ये असता तेव्हा सगळ्याच गोष्टी तुमच्या पणाला लागला.कारण टीमकडुन खूप अपेक्षा असतात. त्यामुळे तुम्हाला हसावस वाटलं तरी हसता येत नाही. कारण जेव्हा तुम्ही वर्ल्ड कप खेळता, तेव्हा भारतात हारणे हे कुणालाच मंजुर नसते. पण असं नसतं हा खेळ आहे.तुम्ही अख्ख आयुष्य एका गोष्टीत टाकता पण त्याच्यातून तुम्हाला परत काही मिळेल याची गँरंटी नाही आहे. हे काही शेअर मार्केट नाही आहे तुम्ही इन्वेस्ट केले त्याचं तुम्हाला रिटर्न मिळालं. पण खेळात तुम्ही दीड वर्ष मेहनत करता आणि काही गँरटी नव्हती की आम्ही वर्ल्ड कप जिंकणार. जर आम्ही वर्ल्डकप जिंकलो नसतो आणि सेमी फायनलला हारलो असतो, तर रिटर्न आम्हाला काहीच मिळालं नसतं, असे गंभीर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : धोनीच नाव आणि ती कमेंट,गंभीरचा चेहरा बघण्यासारखा होता, कधी नव्हे तो असा हसला
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement