दरम्यान, या फिल्मला मिळत असलेलं यश काहींना बघवत नसल्याचं दिसतंय. याच प्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट शेअर करत चित्रपटाला गालबोट लावणाऱ्या समाजकंठकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
कसा पेटला वाद?
अभिनेता रणवीर सिंहने या फिल्ममध्ये 'जसकीरत' हे शीख पात्र साकारले आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात रणवीरने डोक्यावर पगडी बांधलेली असताना हातात सिगारेट पकडली आहे. या फोटोमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुंबईत पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे.
advertisement
अवघ्या 72 तासांत 1300 कोटींची कमाई! 'ही' नवी फिल्म 'धुरंधर'साठी ठरली डोकेदुखी, बॉक्स ऑफिसवर कब्जा
'शीख इन महाराष्ट्र' या संघटनेचे अध्यक्ष सरदार गुरज्योत सिंग यांनी याप्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या मते, "पगडी, दाढी आणि कडे हे शीख धर्माचे पवित्र प्रतीक आहेत. अशा वेशभूषेत सिगारेट ओढताना दाखवणं हा गुरु गोविंद सिंग जी आणि संपूर्ण समुदायाचा अपमान आहे." त्यांनी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशातच, या प्रकरणावर दिग्दर्शक आदित्य धर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी थेट एक निवेदन जारी करत आपला राग व्यक्त केला आहे.
आदित्य धरने दिलं सडेतोड उत्तर
दिग्दर्शक आदित्य धर यांनी गुरुवारी स्पष्ट केलं की, व्हायरल झालेला तो फोटो पूर्णपणे बनावट आहे. आदित्य म्हणाले, "काही विकृत प्रवृत्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आमच्या चित्रपटातील अधिकृत पोस्टरशी छेडछाड करत आहेत. रणवीर सिंहने पगडी घालून सिगारेट ओढल्याचा कोणताही सीन चित्रपटात नाही आणि आम्ही असं कोणतंही पोस्टर रिलीज केलेलं नाही. हा केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे."
आदित्य धर यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, "मी शीख समुदायाचा मनापासून आदर करतो. चित्रपटात जसकीरतचं पात्र अत्यंत संवेदनशीलतेने आणि आदराने रेखाटलं आहे. जे लोक अशा प्रकारे मॉर्फ केलेले फोटो पसरवत आहेत, त्यांच्यावर आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करणार आहोत. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की, अशा अफवांना बळी पडू नका आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा."
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहचा रोल काय?
'धुरंधर' च्या पहिल्या भागात दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे रणवीर सिंह 'हम्झा अली मजारी' नावाचा अंडरकव्हर एजंट बनून पाकिस्तानच्या ल्यारी गँगमध्ये शिरतो. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाखवलं आहे की, हम्झा हा प्रत्यक्षात जसकीरत सिंग रंगी नावाचा एक शीख तरुण असतो, ज्याला आपल्या वडिलांप्रमाणे भारतीय लष्करात भरती व्हायचं असतं. एका सामान्य शीख कुटुंबातील मुलगा ते पाकिस्तानातील अंडरकव्हर एजंट असा रणवीर सिंहचा प्रवास पाहताना अंगावर काटा येतो.
