TRENDING:

Akshaye Khanna: 'तू असा का आहेस?' शाहरुख खानला विचित्र वाटायचा अक्षय खन्ना! पॅप्स समोरच विचारलेला नको तो प्रश्न, म्हणाला...

Last Updated:

Akshaye Khanna: सध्या अक्षय खन्ना आणि शाहरुख खान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा ट्रेन्डिंग झाला आहे, ज्यामध्ये शाहरुख अक्षयला त्याच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' या स्पाय थ्रिलर चित्रपटातील 'रहमान डकैत' या खतरनाक भूमिकेमुळे सध्या गाजतोय. त्याच्या या जबरदस्त परफॉर्मन्सची सर्वत्र चर्चा आहे. पण याचदरम्यान, अक्षय खन्ना आणि शाहरुख खान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा ट्रेन्डिंग झाला आहे.
News18
News18
advertisement

हा व्हिडिओ २०१७ मध्ये आलेल्या 'इत्तेफाक' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळीचा आहे. या व्हिडिओमध्ये शाहरु खान, अक्षय खन्नाच्या खास आणि वेगळ्या स्वभावावर भाष्य करताना त्याला विनोदी अंदाजात विचारतोय "तू असा का आहेस रे?"

शाहरुख खानचा अक्षय खन्नाला अजब प्रश्न

शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेन्मेंट'ने 'इत्तेफाक'ची निर्मिती केली होती. त्या चित्रपटाच्या एका मीडिया सेशनमध्ये होस्ट करण जोहरने अक्षय खन्नाला त्याच्या फिल्म प्रमोशनमध्ये कमी सहभागी होण्याच्या सवयीवरून चिडवले होते.

advertisement

या गप्पांदरम्यान, शाहरुखने अक्षयच्या अभिनय शैलीचे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. शाहरुख म्हणाला, "तो नेहमीच थोडा ऑफबीट असतो. तो वेगळ्या तालावर नाचतो, आणि मला ते खूप मनोरंजक वाटते. तो कधीतरी येतो आणि काहीतरी अविश्वसनीय निर्माण करतो. एक अभिनेता म्हणून मी त्याचे खरोखर खूप कौतुक करतो."

Akshaye Khanna Dhurandhar: 'मला कळून चुकलं...', 'धुरंधर' पाहताच अक्षय खन्नाच्या Ex GF ची लांबलचक पोस्ट

advertisement

इतके कौतुक केल्यानंतर शाहरुखने हसून लगेच अक्षयला एक अजब प्रश्न विचारला, "एवढं बोलून मी तुला हे विचारू शकतो, की तू असा का आहेस?"

SRK talking about Akshaye Khanna

byu/Acrobatic_Neck_5866 inBollyBlindsNGossip

'धुरंधर'मधील जबरदस्त कामाची प्रेक्षकांना भुरळ 

advertisement

सध्या सोशल मीडियावर फक्त अक्षय खन्ना हा एकमेव अभिनेता ट्रेंड होताना दिसत आहे. चित्रपटातील त्याच्या अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत. अशातच अक्षय आमि शाहरुखचा हा व्हिडीओ समोर आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

अभिनेता म्हणून त्याची इन्ट्रोव्हर्ट पर्सनॅलिटी आणि पडद्यावरील त्याचे जबरदस्त स्क्रीन प्रेझेंस नेहमीच त्याचे चाहते आणि सहकलाकारांसाठी उत्सुकतेचा विषय राहिले आहे. अक्षय खन्नाला 'धुरंधर'साठी मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादात या व्हिडिओने भर घातली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshaye Khanna: 'तू असा का आहेस?' शाहरुख खानला विचित्र वाटायचा अक्षय खन्ना! पॅप्स समोरच विचारलेला नको तो प्रश्न, म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल