दिशा पटानीच्या घराबाहेर नेमकं काय घडलं होतं?
१२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास दोन दुचाकीस्वार दिशा पटानीच्या बरेली येथील घराजवळ आले आणि त्यांनी गोळीबार केला. त्यावेळेस दिशाचे वडील, जे एक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, जगदीश पटानी, ते घरातच होते. त्यांच्या कुत्र्यांनी आवाज केल्यावर ते बाल्कनीमध्ये आले. त्यांनी त्या दोघांना विचारलं, ‘तुम्ही कोण आहात?’ तेव्हा एकाने 'यांना मारून टाका,' असं म्हटलं आणि गोळीबार सुरू केला.
advertisement
जगदीश पटानी एका खांबाच्या मागे लपले, ज्यामुळे ते बचावले. मारेकऱ्यांनी अनेक राऊंड गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर रोहित गोदारा-गोल्डी ब्रार गँगने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दिशाच्या कुटुंबाने सनातन धर्म आणि काही संतांबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांनी हा हल्ला केल्याचं म्हटलं होतं.
पोलिसांनी आरोपींना गोळ्या घातल्या!
या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः जगदीश पटानी यांच्याशी बोलून, या प्रकरणाचा लवकर तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
बुधवारी पोलिसांनी गाझियाबादजवळ त्या दुचाकीस्वारांना पाहिलं. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या एसटीएफ टीमने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात आरोपी रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.