"बाहेर मी सरकार म्हणून वावरते!"
घरामध्ये एक टास्क सुरू होता, जिथे स्पर्धकांना एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुली मारून त्यांना घरासाठी अपात्र ठरवायचं होतं. तन्वी कोल्तेने जेव्हा दिव्याचं नाव घेतलं, तेव्हा दिव्याचा संयम सुटला. रागाच्या भरात ती जे बोलली, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
advertisement
दिव्या म्हणाली, "मी या घराबाहेर 'सरकार' म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल, हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल." एका रिअॅलिटी शोमध्ये अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणं हे बिग बॉसच्या नियमावलीच्या पूर्णपणे विरोधात होतं.
घरात गदारोळ अन् बिग बॉसचा रुद्रावतार
दिव्याच्या या विधानानंतर तन्वी, अनुश्री आणि रुचिता यांनी तिला धारेवर धरलं. "ही उघड धमकी आहे," असा आरोप त्यांनी केला. जेव्हा बिग बॉसने मध्यस्थी केली, तेव्हा दिव्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी ही धमकीच असल्याचं ठामपणे सांगितलं. यावर बिग बॉसने अत्यंत कडक शब्दांत दिव्याला सुनावलं. बिग बॉस म्हणाले, "अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. एरव्ही संविधानाच्या, मानवी हक्कांच्या गोष्टी करता, महापुरुषांचे विचार मांडता आणि इथे येऊन धमकी देता. मी तुम्हाला बोलायची संधी देणार नाही."
माफीला नकार अन् एक्झिट
प्रकरण वाढल्यावर बिग बॉसने दिव्या आणि राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. तिथे तिला आपली चूक सुधरवण्याची आणि घरातील सदस्यांची माफी मागण्याची संधी देण्यात आली. मात्र, दिव्या आपल्या मुद्द्यावर ठाम होती. तिने बिग बॉसची दिलगिरी व्यक्त केली, पण सदस्यांची माफी मागण्यास साफ नकार दिला. शिस्तीचा भंग आणि धमकी देणं या कारणास्तव बिग बॉसने तात्काळ निर्णय घेत दिव्याला थेट घराबाहेर काढलं आहे.
