आता या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी अमेरिकेत लपून बसलेल्या हिमांशू भाऊ गँगने घेतली आहे. मात्र अद्याप याविषयी कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फक्त सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार एल्विशच्या घरावर गोळीबार प्रकणात ‘हिमांशू भाऊ गँग’चा हात आहे.
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; 10 ते 12 गोळ्या झाडल्या, गुरुग्राममध्ये खळबळ
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात हा दहशत पसरवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, “घटनेनंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून, या पोस्टचीही चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावरील दाव्यांना आम्ही गांभीर्याने घेत आहोत. लवकरच आरोपींचा माग काढला जाईल.” एल्विश यादव याच्या चाहत्यांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर युट्युबरच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली आहे.