advertisement

Elvish Yadav House Firing: एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; 10 ते 12 गोळ्या झाडल्या, गुरुग्राममध्ये खळबळ

Last Updated:

Elvish Yadav House Firing: प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण रविवारी पहाटे हरियाणातील गुरुग्राम येथील त्याच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.

 एल्विश यादवच्या घरावर गोळीबार
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार
मुंबई : प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण रविवारी पहाटे हरियाणातील गुरुग्राम येथील त्याच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वारांनी एल्विशच्या घराबाहेर 10 ते 12 राउंड फायरिंग केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
advertisement
एल्विश यादव हा देशातील सर्वात चर्चेत असलेला सोशल मीडिया स्टार मानला जातो. यूट्यूबवर त्याचे मोठे फॅनबेस आहे. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तो विजेता बनला आणि बिग बॉसच्या इतिहासात नवा विक्रम रचला. याशिवाय, तो करण कुंद्रासोबत ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्येही विजेता ठरला होता.
advertisement
एल्विश नेहमीच वादात राहिला आहे. त्याने एका हॉटेलमध्ये चाहत्याला थप्पड मारल्याची घटना व्हायरल झाली होती. दुसऱ्या वेळी त्याने युट्यूबर मॅक्सटर्नलाही चापट मारली होती. याशिवाय, रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात त्याला तुरुंगात जावे लागले होते.
या गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत. “हे कोणाने आणि का केले?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Elvish Yadav House Firing: एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; 10 ते 12 गोळ्या झाडल्या, गुरुग्राममध्ये खळबळ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement