'माझी पूर्णाआजी', ज्योती चांदेकरांच्या निधनाने तुटली 'ठरलं तर मग' ची अभिनेत्री, Emotional Post

Last Updated:

Jyoti Chandekar Passed Away :ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 ज्योती चांदेकरांच्या निधनाने तुटली 'ठरलं तर मग' ची अभिनेत्री
ज्योती चांदेकरांच्या निधनाने तुटली 'ठरलं तर मग' ची अभिनेत्री
मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 16 ऑगस्ट रोजी त्यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. ज्योती यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत त्या ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारत होत्या. त्यामुळे मालिकेच्या कलाकारांवरही दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.
advertisement
'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांनी 'पूर्णा आजी' साठी भावूक पोस्ट केल्या आहेत. अशातच मालिकेतील 'अस्मिता' म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेदेखील धक्क्यात आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटलं, 'तू आहेस ...!! माझ्या आणि वृंदा सोबत ..!! I love you and will miss you..!! माझी पूर्णाआजी ..!!!"
दरम्यान, मोनिकाने शेअर केलेल्या भावूक पोस्ट पाहून चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. सगळ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ज्योती चांदेकर यांचं निधन आज सकाळी ११ वाजता पुण्यात झालं. त्या गेल्या काही काळापासून आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, पौर्णिमा आणि तेजस्विनी, असा त्यांचा परिवार आहे.
advertisement
advertisement
ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतील 'पूर्णा आजी'च्या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझी पूर्णाआजी', ज्योती चांदेकरांच्या निधनाने तुटली 'ठरलं तर मग' ची अभिनेत्री, Emotional Post
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement