मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वारांनी एल्विशच्या घराबाहेर 10 ते 12 राउंड फायरिंग केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
advertisement
'माझी पूर्णाआजी', ज्योती चांदेकरांच्या निधनाने तुटली 'ठरलं तर मग' ची अभिनेत्री, Emotional Post
एल्विश यादव हा देशातील सर्वात चर्चेत असलेला सोशल मीडिया स्टार मानला जातो. यूट्यूबवर त्याचे मोठे फॅनबेस आहे. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तो विजेता बनला आणि बिग बॉसच्या इतिहासात नवा विक्रम रचला. याशिवाय, तो करण कुंद्रासोबत ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्येही विजेता ठरला होता.
एल्विश नेहमीच वादात राहिला आहे. त्याने एका हॉटेलमध्ये चाहत्याला थप्पड मारल्याची घटना व्हायरल झाली होती. दुसऱ्या वेळी त्याने युट्यूबर मॅक्सटर्नलाही चापट मारली होती. याशिवाय, रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात त्याला तुरुंगात जावे लागले होते.
या गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत. “हे कोणाने आणि का केले?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.