आपण बोलत आहोत 'वश लेव्हल 2' (Vash Level 2) या सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलरबद्दल, ज्याने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 103 मिनिटांच्या या चित्रपटात दर 5 मिनिटाला मडरर बदलतो असं वाटतं आणि शेवटच्या सीनपर्यंत सस्पेन्सचा असा काही माइंड गेम चालतो की तुम्ही थक्क व्हाल.
12 वर्षांनंतरचं तेच भयाण संकट
advertisement
या चित्रपटाची कथा पहिल्या भागातील ('वश') घटनांनंतर 12 वर्षांनी सुरू होते. अथर्वने आपली मुलगी आर्याला त्या सैतानी शक्तींपासून वाचवलं होतं, पण ती काळी शक्ती कधीच नष्ट झाली नव्हती. आर्या अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही. अचानक शाळेतील मुली छतावरून उड्या मारतात, शहरात हिंसाचार सुरू होतो आणि गाड्या जाळल्या जातात. हे सर्व प्रताप या काळ्या जादूगाराचा भाऊ राजनाथ याचं कारस्थान असतं.
चित्रपटाचा क्लायमॅक्स तर इतका भयानक आहे की कमकुवत मन असणाऱ्यांनी तो पाहू नये. यात जीभ कापण्यासारखे दृश्य आहेत जे अंगावर काटा आणल्याशिवाय रहाणार नाही. अथर्व पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासाठी या काळ्या शक्तींविरुद्ध उभा राहतो. शेवटी तो दोन्ही भावांना कैद करून विजय मिळवतो, पण या लढाईत त्याला मिळालेल्या जखमा खूप खोल असतात.
या चित्रपटात जानकी बोदीवाला, हितु कनोडिया, मोनल गज्जर आणि हितेन कुमार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः जानकी आणि हितेन कुमार यांचा अभिनय तुम्हाला खिळवून ठेवतो. भारतामध्ये या चित्रपटाने 13.64 कोटींची कमाई केली, तर वर्ल्डवाइड कलेक्शन 13.8 कोटींच्या आसपास होतं.
IMDb रेटिंग: प्रेक्षकांनी याला 10 पैकी 7.3 असं तगडं रेटिंग दिलं आहे.
आता घरबसल्या घ्या थराराचा अनुभव
जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर काळजी करण्याचं कारण नाही. 22 ऑक्टोबर 2025 पासून हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही पहिला भाग 'वश' पाहिला असेल, तर हा सीक्वेल तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
थोडक्यात सांगायचं तर, हॉरर आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'वश लेव्हल 2' ही एक 'परफेक्ट चॉईस' आहे. पण लक्षात ठेवा, हा चित्रपट पाहताना लाइट चालू ठेवायला विसरू नका.
