TRENDING:

"प्रयत्ने चिंचोकी घासता..." नाशिकच्या लिंगपिसाट खरातला प्रसिद्ध दिग्दर्शकाची सणसणीत चपराक, अवघ्या 6 शब्दात घेतला समाचार

Last Updated:

Ashok Kharat arrest: प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेली अतिशय छोटी पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलंच तापलं असून याबद्दल महाराष्ट्रातून नाही, तर आता देशातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण, बलात्कार आणि खरातचा चाललेला नंगा नाच पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता मनोरंजन विश्वातही उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणावर एक जळजळीत पोस्ट शेअर केली होती. यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेली अतिशय छोटी पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
News18
News18
advertisement

काय आहे अशोक खरात प्रकरण?

नाशिकचा हा भोंदूबाबा अशोक खरात वास्तविक एक लिंगपिसाट नराधम निघाला आहे. SIT ने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असून तपासात समोर आलेल्या गोष्टी ऐकल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. पोलिसांना खरातच्या ताब्यातून तब्बल ५८ अश्लील व्हिडिओ सापडले असून यामध्ये तो महिलांवर तंत्रमंत्राच्या नावाखाली अत्याचार करताना दिसत आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ महिला समोर आल्या आहेत. तंत्रमंत्राच्या दबावाखाली त्याने या महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. केवळ महिलाच नाही, तर खरातने एका विद्यार्थिनीचेही त्याने लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले असून आतापर्यंत त्याच्यावर ७ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

advertisement

"आता म्हणतात, 'आम्ही चूक केली!'", बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी रिजेक्ट केला 'रहमान डकैत' चा रोल, कास्टिंग डायरेक्टरचा भांडाफोड

खरात प्रकरणावर सचिन गोस्वामींची जळजळीत पोस्ट

या संतापजनक प्रकारावर प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. सचिन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, “प्रयत्ने चिंचोकी घासता, लाख ही मिळे…” हे वाक्य उपहासात्मक असून महिलांच्या असहायतेचा गैरवापर करणाऱ्या खरातला त्यांनी आपल्या शब्दांनी फटकारले आहे. मराठीमध्ये एक जुनी म्हण आहे, "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे." याच म्हणीचा वापर करत खरातने कशा प्रकारे 'चिंचोकी' म्हणजेच क्षुल्लक भोंदूगिरी घासून लाखो रुपये आणि सत्ता कमावली, यावर त्यांनी हे भाष्य केलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

याआधी अतुल कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर कठोर पोस्ट शेअर करत समाजाला जळजळीत प्रश्न विचारले होते. अतुल यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं, "हे लोक पकडले गेले तरच 'भोंदू' ठरतात, पण त्याआधी ते कोण असतात?" सध्या खरातचे बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि संबंधही समोर येत असल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनलं आहे. एसआयटी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून खरातच्या या विकृत उद्योगात त्याला साथ देणाऱ्यांचा पर्दाफाश लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
"प्रयत्ने चिंचोकी घासता..." नाशिकच्या लिंगपिसाट खरातला प्रसिद्ध दिग्दर्शकाची सणसणीत चपराक, अवघ्या 6 शब्दात घेतला समाचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल