TRENDING:

प्रसिद्ध गायकासोबत धक्कादायक घटना, LIVE कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांनी पँटच खेचली; पाहा VIDEO

Last Updated:

Famous Singer : प्रसिद्ध गायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता LIVE कॉन्सर्टदरम्यान या गायकाची पँट खाली खेचताना दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Famous Singer : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अकॉन सध्या भारतात आहे. 14 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये त्यांची एक कॉन्सर्ट पार पडली. आता 19 तारखेला अकॉन मुंबईत आपल्या सुरांची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. पण बेंगळुरूमधील कॉन्सर्टदरम्यान अकॉनला मोठा फटका बसला आहे. चाहत्यांची एक कृती प्रेम आहे की अत्याचार? असा प्रश्न उपस्थित करणारी होती. LIVE कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांनी अकॉनची पँट खाली खेचली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. त्यामुळे अकॉन हा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही.
News18
News18
advertisement

मुंबईत करणार धमाका

सेनेगल-अमेरिकन गायक अकॉन सध्या आपल्या India Tour 2025 साठी भारतात आले आहेत. 16 नोव्हेंबरला मुंबईत त्यांचा शेवटचा शो आहे. 9 नोव्हेंबरला दिल्लीपासून त्यांनी त्यांच्या टूरची सुरुवात केली होती. नंतर 14 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडली. शुक्रवारी झालेल्या बेंगळुरू शो नंतर या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते गात असताना चाहते त्यांची पँट खाली खेचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अकॉन गाणं सादर करत असताना चाहता त्यांची पँट खाली खेचतो. अकॉनही फरफॉर्मन्सदरम्यान पँट वर ओढतात आणि शांत राहुन परफॉर्मन्स सुरू ठेवतात.

advertisement

अकॉनचा व्हिडीओ व्हायरल

अकॉनचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त करत या कृतीला उत्पीडन म्हटलं आहे आणि या वर्तनाची निंदा केली आहे. अनेकांनी अकॉनचा अपमान झाल्याचे सांगितले आणि म्हटले की तो एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहे जो भारतात परफॉर्म करण्यासाठी आला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे,"हे खूप वाईट आहे, स्टेजवर लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अशापद्धतीचा त्रास देणं चुकीचं आहे. ते एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत आणि ते त्यांना छळत आहेत". दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले,"हे काय आहे भाऊ? हे पूर्णपणे चुकीचं आहे."

advertisement

भारतातील प्रेमाबद्दल अकॉनची प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

भारतामधील आपल्या शोच्या आधी अकॉन म्हणाले होते,"भारताने मला नेहमीच खूप प्रेम दिले आहे. भारत हे माझं दुरसं घरच आहे. इथली ऊर्जा, संस्कृती, चाहते... सर्व काही वेगळ्या स्तराचे आहे. मी पुन्हा येथे येऊन तुम्हा सर्वांसाठी लाइव्ह परफॉर्म करायला खूप उत्साहित आहे. ही टूर काहीतरी खास असणार आहे. चला मिळून इतिहास रचूया!". अकॉनने Right Now, I Wanna Love You, Smack That, Lonely, Beautiful, Don’t Matter आणि Chammak Challo सारख्या हिट गाण्यांसह जागतिक पातळीवर आपलं नाव कमावलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध गायकासोबत धक्कादायक घटना, LIVE कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांनी पँटच खेचली; पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल